Emraan Hashmi And Aishwarya Rai Bachchan: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘शो टाइम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे. १२ जुलैला इमरानची ही वेब सीरिज ‘हॉटस्टार’वर प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे ‘शो टाइम’ वेब सीरिजच प्रमोशन करताना इमरान हाश्मी दिसत आहे. विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच त्याने ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या राय-बच्चनसंबंधित केलेल्या एका वक्तव्यामुळे पश्चाताप झाल्याचं जाहीर केलं. तसंच माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली. या कॉन्ट्रोवर्सीबाबत इमरान हाश्मी नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…
काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या पर्वाच्या एका भागात इमरान हाश्मी सहभागी झाला होता. यावेळी एक खेळ खेळताना इमरानने ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. “एक हँपर जिंकण्यासाठी मी ऐश्वर्याला प्लास्टिक म्हणालो होतो”, असं अभिनेत्याने सांगितलं होतं. २०१९ मधील फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या म्हणाली होती की, मी फेक आणि प्लास्टिक असल्याचं म्हटलं गेलं आहे; जे अत्यंत वाईट आहे. या वक्तव्यामुळेच ऐश्वर्याने इमरान हाश्मीबरोबर काम करण्यास नाकारलं, अशा चर्चा रंगल्या.
हेही वाचा – Shah Rukh Khan and Salman Khan Dance: अनंत अंबानीच्या वरातीत करण-अर्जुनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
पण आता बऱ्याच वर्षांनंतर इमरान हाश्मी व ऐश्वर्या राय-बच्चनची ही कॉन्ट्रोवर्सी चर्चेत आली आहे. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरानला विचारण्यात आलं की, ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटल्याचा पश्चाताप होतोय? हा प्रश्न ऐकताना इमरान म्हणाला, “हो. मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मी जिच्याबाबत म्हणालो होतो, तिचा मी खूप सन्मान करतो. मला त्या वक्तव्याचा पश्चाताप होतोय, कारण ते अपमानजनक असू शकत. आता लोक खूप जास्त संवेदनशील झाले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर नाराजी व्यक्त केली जातं आहे. जर ऐश्वर्या राय-बच्चनला वाईट वाटलं असेल तर मला तिची माफी मागायची आहे.”
पुढे इमरान म्हणाला, “मी स्वतः ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या राय-बच्चनला पाहण्यासाठी मी तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर ३ तास उभा होतो. त्यावेळेस मी ‘कसूर’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. मी अजूनपर्यंत तिला प्रत्यक्षात भेटलो नाहीये. पण जेव्हा मी भेटेन तेव्हा मी तिची माफी मागायला तयार आहे.”
ऐश्वर्यासंबंधित Emraan Hashmiची ‘ती’ पोस्ट झालेली व्हायरल
दरम्यान, गेल्या वर्षी इमरानने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळेसही इमरानच्या या वक्तव्याची चर्चा पुन्हा रंगली होती. इमरानने एक्सवर अक्षय कुमारबरोबर एक फोटो शेअर केला होता. दोघांच्या मागे ऐश्वर्या राय-बच्चनचा फोटो होता. या फोटोला इमरानने कॅप्शन दिलं होतं की, तिच्याबरोबर (ऐश्वर्या) नाही तर तिच्या फोटोबरोबर सेल्फी घेऊ, हो ना अक्षयकुमार. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.