बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता इमरान हाश्मी(Emraan Hashmi)ने दाऊद इब्राहिमपासून प्रेरित असलेल्या भूमिकेविषयी वक्तव्य केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इमरान हाश्मीने ‘लल्लनटॉपला’ मुलाखत दिली असून यावेळी त्याने अनेक खुलासे केले आहेत. एका चित्रपटाविषयी त्याने आठवण सांगतली आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटातील इमरान हाश्मीने निभावलेल्या भूमिकेविषयी महेश भट्ट यांनी अभिनेत्याला इशारा दिला होता. महेश भट्ट यांनी म्हटले होते की, जर चित्रपटातील तुझी भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही तर त्याचा तुझ्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, इतकेच नाही तर चित्रपटसृष्टीतील तुझी कारकीर्द संपू शकते. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

हेही वाचा: ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी विकी कौशलबरोबर पत्नी कतरिना कैफची हजेरी; चाहते म्हणाले, “हे दोघे…”; पाहा व्हिडीओ

Emraan Hashmi ने सांगितले महेश भट्ट यांचा ‘या भूमिकेला का विरोध होता?

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात इमरानने शोएबची भूमिका निभावली होती. शोएब हे पात्र दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका होते, त्यामुळे महेश भट्ट यांनी ही भूमिका करण्याआधी इमरानला इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही इमरानने ही भूमिका निभावली. या चित्रपटात अजय देवगण हा सुलतान मिर्झा या भूमिकेत असून तो चित्रपटाच्या शेवटी मरतो आणि शोएब संपूर्ण शहरावर ताबा मिळवतो, असा चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे. इमरान हाश्मी म्हणतो, जिथे नायक मरतो आणि खलनायक राज्य करतो असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षक स्वीकारतील की नाही, याची महेश भट्ट यांना काळजी होती. मात्र, चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक मिलान लुथारिया यांची माफी मागितली. तो पुढे म्हणतो, मी रिस्क घेतली आणि तो चित्रपट केला. कधी कधी धोके पत्करूनच यश मिळवता येते, यावर त्याने भर दिला. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा चित्रपट मिलान लुथारिया यांनी दिग्दर्शित केला असून अजय देवगण, इमरान हाश्मी, प्राची देसाई, कंगना रणौत, रणदीप हुड्डा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

दरम्यान, याआधी दिलेल्या एका मुलाखतीत इमरान हाश्मीने आपल्या कुटुंबाचा अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी विरोध असल्याचे सांगितले होते. त्यावेळी महेश भट्ट यांनी त्याला चित्रपटात संधी देत विश्वास दाखवला होता, अशी आठवण सांगितली होती.