Ground Zero Box Office Collection Day 1: गेल्या काही दिवसांपासून इमरान हाश्मीच्या ( Emraan Hashmi ) ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर २५ एप्रिलला इमरान हाश्मीचा हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या आणि समिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींना चित्रपटाची कथा आवडली नाही. त्यामुळे याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. इमरान हाश्मीच्या या चित्रपटाची संथ गतीने सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाने किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या…
‘ग्राउंड झिरो’ ( Ground Zero ) चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २००१ मध्ये झालेल्या काश्मीर येथील घटनेवर हा चित्रपट आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीसह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) झळकली आहे. यामध्ये इमरानने बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांची भूमिका साकारली आहे. सॅकनिल्कनुसार, ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त १ कोटींची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘ग्राउंड झिरो’ ( Ground Zero ) चित्रपटाची टक्कर सनी देओच्या ‘जाट’ आणि अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाबरोबर झाली आहे. अक्षयच्या चित्रपटाने आठव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.२५ कोटींची कमाई केली आहे. तर सनी देओच्या ‘जाट’ने १६व्या दिवशी ०.९० लाख कलेक्शन केलं आहे.
दरम्यान, गेल्या ५० वर्षांतील ‘बीएसएफ’चं सर्वांत मोठं मिशन ‘ग्राउंड झिरो’ ( Ground Zero ) चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये या मिशनचं नेतृत्व कमांडर नरेंद्र नाथ दुबे म्हणजे इमरान हाश्मी करताना दिसत आहे. पहिल्यांदाच इमरान लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देओस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटात इमरान, सई यांच्याव्यतिरिक्त झोया हुसैन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना व राहुल वोहरा यांसारखे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अर्हाना बगाती, टॅलिसमॅन फिल्म्स, अभिषेक कुमार व निशिकांत रॉयने सांभाळली आहे.