Esha Deol-Bharat Takhtani : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर आता विभक्त झाले आहेत.
ईशा आणि भरत यांच्या टीमकडून दिल्ली टाइम्सला निवेदन देण्यात आलं आहे. “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा.” असं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे.
हेही वाचा : ‘झी मराठी’वर १२ फेब्रुवारीपासून होणार मोठा बदल! ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका आता नवीन वेळेत, जाणून घ्या…
ईशाने याबाबत सोशल मीडियावर अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. या जोडप्याला राध्या ( ६ ) आणि मिराया ( ४ ) अशा दोन मुली आहेत.
दरम्यान, ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरत तख्तानीशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या अभिनेत्रीने तिच्या पहिल्या अपत्याला म्हणजेच राध्याला जन्म दिला. त्यानंतर २०१९ मध्ये ईशाला दुसरी मुलगी झाली. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या होत्या. सोशल मीडियावर तिने पतीसह फोटो शेअर करणंही थांबवलं होतं.
हेही वाचा : “अहो! हा पुरस्कार…”, जिनिलीयाचं मराठी ऐकून भर कार्यक्रमात रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या! अभिनेत्री म्हणते…
याशिवाय ईशाचा नवरा हेमा मालिनींच्या ७५ व्या वाढदिवसाला देखील हजर राहिला नव्हता. दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या.