धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून ईशाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला बरेच पुरस्कारही मिळाले. ईशाने अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘धूम’मध्ये ईशाबरोबर अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोप्रा आणि रिमी सेन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. हा चित्रपट चांगलाच गाजला. पुढे याचे दोन भागही आले परंतु आजही पहिल्या ‘धूम’ची प्रेक्षक आवर्जून आठवण काढतात. तेव्हाच्या हिंदी चित्रपटसृष्टीला एक वळण देणारा चित्रपट म्हणून ‘धूम’कडे पाहिलं जातं.

आणखी वाचा : हिरवी साडी, बॅकलेस ब्लाऊज; ग्लॅमरस भाग्यश्री मोटेचा साधा पण बोल्ड लूक व्हायरल

या चित्रपटात ईशाची अत्यंत बोल्ड भूमिका होती. यात तिच्यावर चित्रित होणारं एक आयटम नंबर होतंच शिवाय यातील एका सीनमध्ये ईशाला बिकिनी परिधान करायला सांगितली होती. त्यावेळी तिने यासाठी आपली हेमा मालिनी यांची परवानगी घ्यायचं ठरवलं होतं. जेव्हा ईशाने आपल्या आईकडे यासाठी विचारणा केली तेव्हा हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया काय होती यावर ईशाने भाष्य केलं होतं.

‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशाने याबद्दल खुलासा केला होता. ईशा म्हणाली, “मी जेव्हा चित्रपटात बिकिनी घालण्याबद्दल आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली की, खरंच तू माझी परवानगी घ्यायला आली आहेस? तू जेव्हा तुझ्या मित्र मैत्रिणीबरोबर जातेस फिरायला तेव्हा तेव्हा बीचवर तू बिकिनी परिधान करतेस ना? आणि आईला माहीत होतं मी कोणाबरोबर काम करणार आहे त्यामुळे ती निर्धास्त होती.”

ईशा शेवटची २००८ च्या ‘हायजॅक’ या चित्रपटात झळकली होती. नुकतीच ईशा आपला भाऊ सनी देओलच्या ‘गदर २’च्या खास स्क्रीनिंगदरम्यान मीडियासमोर आली तेव्हापासून ती चर्चेत आहे.