बॉलीवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांचे आजही करोडो चाहते आहेत. हेमा मालिनी एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्याबरोबरच एक चांगल्या नृत्यांगना देखील आहेत. चित्रपट असो किंवा पर्सनल लाईफ हेमा मालिनी नेहमीच चर्चेत असतात. एकेकाळी रुपरी पडदा गाजवणाऱ्या हेमा मालिनी गेली ४ ते ५ वर्षे मनोरंजनसृष्टीपासून लांब आहे. पण आता लवकच त्या चित्रपटांमध्ये कमबॅक करणार आहेत. ईशा देओलने हेमा मालिनी यांच्या पुनरागमनाबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशलने केलं बेबी प्लॅनिंगबद्दल भाष्य, म्हणाला, “आमच्या दोघांच्या घरचे…”

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या सिमला मिर्च या चित्रपटात हेमा मालिनी शेवटच्या दिसल्या होत्या. ५ वर्षांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता हेमा मलिनी चित्रपटांमध्ये पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. हेमा मलिनी यांची मुलगी ईशा देओलने एका मुलाखतीत हेमा मालिनींच्या कमबॅकबाबत खुलासा केला आहे.

ईशा म्हणाली, “आई काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे. तिला चित्रपटांमध्ये पुनरागमन करायचं आहे. मी त्यासाठी तिला नेहमी प्रोत्साहित करत आहे. ती चांगल्या भूमिका आणि स्क्रिप्टच्या शोधात आहे. चांगली भूमिका असेल तर नक्कीच यासाठी तयार होईल. कोणाकडे चांगली स्क्रिप्ट असेल तर त्यांनी संपर्क साधावा” असं आवाहनही ईशाने केलं आहे.

हेही वाचा- लग्नाच्या तारखेच्या बातमीबद्दल आमिर खानची लेक आयरा खानचा मोठा खुलासा; म्हणाली…

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून धर्मेंद्र यांनी कमबॅक केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याबरोबर आलिया भट्ट, रणवीर सिंह, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या मुख्य भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esha deol hints about hema malini comeback dpj