रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्याबरोबर जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात धर्मेंद्र व शबाना यांचा एक किसिंग सीन आहे. या किसिंग सीनबाबत आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पत्नी ईशा देओलने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “मला डिस्लेक्सिया होता…” ‘गदर २’ स्टार सनी देओलचा मोठा खुलासा

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”

८७ वर्षीय धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आझमी यांच्याबरोबर किसिंग सीन दिला आहे. त्याबाबत बोलताना ईशा देओल म्हणाली, “प्रेम किंवा चुंबनासाठी वय लागतं असे कोण म्हणाले? पापा स्वभावाने खूप रोमँटिक आहेत. ते त्यांची शायरी आणि कविता सगळं करतात. आम्हाला याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. आमच्यासाठी हे एक आश्चर्यच होतं. आणि ते खूप गोड होते आणि ते दोघेही व्यावसायिक कलाकार आहेत.” शबाना आझमींबाबत बोलताना ईशा म्हणाली, “शबाना जी अप्रतिम आहेत, आणि जया आंटी यांच्यासाठी माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. करण जोहर अप्रतिम आहे. हा चित्रपट सुंदरपणे चित्रित करण्यात आला असून ते सर्व दिग्गज कलाकार आहेत.”

धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनबाबत हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. हेमा मालिनी म्हणाल्या, “धरमजी आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं.”

हेही वाचा- Video: एका मिनिटाचं १ कोटी मानधन, उर्वशी रौतेलाच्या दाव्यावर नेटकऱ्यांना हसू आवरेना; म्हणाले, “ताई तुम्ही मंगळावर जा अन्…”

दरम्यान, शबाना व धर्मेंद्र यांचा किसिंग सीन पाहून नेटकऱ्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया समोर आली होती. “माझ्या आणि शबानाच्या किसिंग सीनमुळे प्रेक्षक नाराज झाल्याचं मी ऐकलं आहे. तर काही लोकांनी याचे कौतुकही केले आहे. मला वाटतं की लोकांना असं काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. गेल्या वेळी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये नफिसा अलीबरोबरही किसिंग सीन दिला होता. त्यावेळी लोकांनी त्याचे कौतुक केले होते,” असं धर्मेंद्र म्हणाले.

Story img Loader