‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका सीनची विशेष चर्चा झाली. तो होता धर्मेंद्र व शबाना यांचा किसिंग सीन. या सीनवर जावेद अख्तर, हेमा मालिनी, खुद्द धर्मेंद्र व शबाना यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता धर्मेंद्र यांची लेक ईशाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”

वडिलांच्या किसिंग सीनबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं ईशाने सांगितलंय. ते सरप्राइज होतं, असंही तिने नमूद केलं. ईशा म्हणाली, “आम्हाला या सीनबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आमच्यासाठी हे एक सरप्राइज होतं. ते दोघेही खूप प्रेमळ वाटत होते आणि ते दोघेही प्रोफेशनल कलाकार आहेत.”

हेमा मालिनींची प्रतिक्रिया काय होती?

“धरमजी आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. यानंतर एका मुलाखतीत धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासारखे ऑनस्क्रीन किसिंग सीन करणे तुम्हाला सोईचे आहे का असा प्रश्न हेमा मालिनी यांना विचारण्यात आला होता. तेव्हा उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या, “का नाही, नक्कीच करेन. जर ते चांगले असेल आणि चित्रपटाशी संबंधित असेल तर कदाचित मी असं करु शकते.”

दरम्यान, रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्याबरोबर जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esha deol reacts on dad dharmendra shabana azmi kissing scene in rocky aur rani ki prem kahani hrc