सनी देओल व अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर: एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अशातच या ट्रेलरबद्दल सनी देओलची सावत्र बहीण ईशा देओलने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
ईशा देओलने ‘गदर २’ चा ट्रेलर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ‘गदर २’ चा ट्रेलर शेअर करताना ईशाने टाळ्या वाजवणारा, हात जोडणारा व रेड हार्ट इमोजी टाकले. तसेच तिने सनी देओलला टॅग केले. सनी देओलनेही ईशाची स्टोरी त्याच्या स्टोरीला पुन्हा पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं.
नुकताच सनी देओलचा मोठा मुलगा करण लग्नबंधनात अडकला. करणने त्याची गर्लफ्रेंड द्रिशाशी १८ जून रोजी लग्नगाठ बांधली. पण करणच्या लग्नात ईशा आणि तिचे कुटुंबीय उपस्थित नव्हते मात्र तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून करणला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता भाऊ सनीच्या चित्रपटाच्या ट्रेलरचं तिने कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘गदर २’ च्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात सनी देओल त्याचा मुलगा जीतसाठी पाकिस्तानशी लढताना दिसणार आहे. यावेळी तारा सिंग, सकिना आणि त्यांचा मुलगा जीत यांची कथा पाहायला मिळणार आहे.