धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने ८ जून रोजी द्रिशा आचार्यबरोबर लग्न केले. करणच्या लग्नानंतर देओल कुटुंब चर्चेत आलं आहे. या लग्नात देओल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सहभागी झाली होती. मात्र, धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा, अहाना या लग्नापासून लांब राहिल्या होत्या. लग्नातील त्यांच्या गैरहजरीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा- …जेव्हा धर्मेंद्र यांनी दारुच्या नशेत धरली होती आपल्याच वडिलांची कॉलर; शिव्या देत म्हणाले होते…

Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…
Anjali damania On Ajit Pawar
Anjali damania : अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; भेटीत काय चर्चा झाली? म्हणाल्या, “धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत…”
Anjali Damania Post About Dhanajay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट, “माझा आणि अजित पवारांचा ३६ चा आकडा आहे, पण धनंजय मुंडे….”
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”
Siddharth Chandekar & Mitali Mayekar wedding anniversary
बायको, तू लढ! बाकी तेरा आदमी…; सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीसाठी खास पोस्ट; हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष

अशातच आता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा तसेच दोन्ही मुलींसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. धर्मेंद्र यांच्या या पोस्टमुळे अनेक तर्के-वितर्के लावले जात आहेत. धर्मेंद्र यांच्या या पोस्टला ईशाने प्रतिक्रिया दिली आहे. ईशानेही भावनिक पोस्ट करत वडिलांप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. ईशाने तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे ज्यात ती तिचे वडील धर्मेंद्र यांच्या मांडीवर बसली आहे. तर दोघांच्या बाजूला ईशाचा नवरा आणि तिची आई हेमा उभे आहेत. .या फोटोबरोबर ईशाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ‘पापा, मी तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला हे माहीत आहे. तुम्ही सर्वात चांगले आहात. आनंदी राहा आणि नेहमी हसतमुख आणि निरोगी रहा.”

धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

धर्मेंद्र यांनी लेक ईशाबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला भावनिक कॅप्शन दिलं होतं. धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं “ईशा, अहाना, हेमा आणि माझ्या सर्व प्रिय मुलांनो… तख्तानी आणि वोहरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो…वय आणि आजारपण मला सांगतंय की मी तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकलो असतो… पण” असं त्यांनी या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

ईशाने ही पोस्ट धर्मेंद्र यांच्याबरोबर आई हेमा मालिनी यांनाही टॅग केली आहे. तसेच तिने ही पोस्ट तिचा पती भरत तख्तानी यांनाही टॅग केली आहे. धर्मेंद्र यांच्या पोस्टवर ईशाचा नवरा आणि त्यांचा जावई भरत तख्तानीने “Love you Papa” अशी कमेंट केली होती.

Story img Loader