ईशा देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ईशाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ईशा अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाव्यतिरिक्त ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर ईशा पती भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेणार आहे. काही दिवासांपूर्वी दिल्ली टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ईशाने याबाबत घोषणा केली होती. ईशाच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, घटस्फोटाच्या घोषणेनंतर ईशाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

ईशाने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ईशा कारमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा टॉप घातला होता व डोक्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली होती. तसेच तिने डोळ्याला गॉगलही लावला होता. हा फोटो शेअर करत ईशाने लिहिले, “कितीही अंधार पडला तरी सूर्य उगवणारच” ईशाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- सलमान खानच्या पँटवर त्याचाच चेहरा; अभिनेत्याचा एअरपोर्ट लूक पाहून चाहते म्हणाले…

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्नगाठ बांधली. ईशा व भरत यांना राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत. अनेकदा ईशा पती व मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र दिसले नाहीत, त्यामुळे ईशा व भरत यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Story img Loader