ईशा देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ईशा अभिनेत्रीच नाही, तर एक चांगली नृत्यांगनाही आहे. ती आता अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. ‘प्यारे मोहन’ चित्रपटादरम्यान ईशा आणि अभिनेत्री अमृता राव यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. दरम्यान, नुकताच एका मुलाखतीत ईशानं या भांडणाचा किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागात का भावुक झाला करण जोहर? रणवीर-दीपिकासमोर व्यक्त केली खंत
२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यारे मोहन’ चित्रपटात ईशा देओल व अमृता राव यांनी एकत्र काम केलं होतं. ईशा व अमृताव्यतिरिक्त या चित्रपटात विवेक ओबेरॉय व फरदीन खान यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रीकरणादरम्यान ईशा व अमृता यांच्यात काही मतभेद होऊन दोघांमध्ये भांडण झालं होतं. दरम्यान, रागाच्या भरात अमृतानं ईशाला शिवीगाळ केली होती आणि ईशानं प्रत्युत्तरादाखल अमृताला जोरदार चापट मारली होती.
हेही वाचा-‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओलनं याबाबतचा किस्सा सांगितला आहे. ईशा म्हणाली, “अमृतानं दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनसमोर माझ्याशी गैरवर्तन केलं होतं. मलाही राग आल्यानं माझा स्वाभिमान आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी मी तिला चापट मारली.”
ईशा म्हणाली, “मला माझ्या कृतीचा कोणताही पश्चात्ताप नाही. कारण- त्या वेळी माझ्याबरोबर ज्या पद्धतीनं ती वागली, त्यासाठी तिच्याबरोबर मी हेच करायला हवं होतं. मी फक्त माझ्या स्वाभिमानासाठी उभी राहिले. त्यानंतर अमृतानं माझी माफीही मागितली आणि मी तिला माफही केलं असून, आता आमच्यातील नातं चांगलं आहे.”
हेही वाचा- Raveena Tandon: रवीना टंडन: अभिनेत्री, फोटोग्राफर आणि दत्तक मुलींची आई
ईशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘कोई मेरे दिल से पूछे’ चित्रपटातून ईशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यानंतर ईशानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. ‘धूम’मध्ये ईशानं साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा शेवटची २००८ च्या ‘हायजॅक’ चित्रपटात दिसली होती.