धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून ईशाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला बरेच पुरस्कारही मिळाले. ईशाने अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

नुकतंच ईशाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतबद्दल भाष्य केलं आहे. कंगनाचा अभिनय याबरोबरच तिचे राजकीय विचार याबद्दल नेमकं काय वाटतं हे ईशाने सांगितलं आहे. ‘बॉलिवूड बबल’शी संवाद साधताना ईशाला प्रश्न विचारण्यात आला की, अशी कोणती अभिनेत्री आहे जीने इतर क्षेत्रातही नशीब आजमवायला हवं? मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कंगनाने राजकारणात जायला हवं का? याबद्दल विचारणा केल्यावर ईशाने उत्तर दिलं.

आणखी वाचा : “हे पॉर्न नाही तर…” भूमी पेडणेकरच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ चित्रपटावर प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला आक्षेप

ईशा म्हणाली, “मी या गोष्टीशी पूर्णपणे असहमत आहे. मला वाटतं ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, मला तिचं ‘थलाईवि’मधलं काम प्रचंड आवडलं. माझ्या आईनेसुद्धा अभिनय करतच राजकारणात काम केलं. त्यामुळे त्यासाठी अभिनय बाजूला ठेवायला हवा असं मला वाटत नाही. मला वाटतं ती उत्तम काम करत आहे.”

कंगना सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताचा याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. याबरोबरच कंगनाच्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. ईशा देओल नुकतीच आपला भाऊ सनी देओलच्या ‘गदर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान मीडियासमोर आली. सध्या ईशा चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.

Story img Loader