अक्षय कुमार आणि त्याचे अफेअर म्हणजे बॉलीवूडमधील चर्चेचा विषय. अक्षयने अभिनेत्री रवीना टंडनला डेट केलं होतं, त्यांचा साखरपुडाही झाला होता, पण लग्न मोडलं. अक्षयची आणखी एक एक्स गर्लफ्रेंड म्हणजे शिल्पा शेट्टी होय. अक्षय व शिल्पा यांनी ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर शिल्पाने कधीच अक्षय कुमारबरोबर काम करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर हे दोघेही कधीच एकत्र स्क्रीनवर झळकले नाही. पण आता या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटात काम करताना अक्षय कुमार शिल्पा शेट्टी यांच्यातील जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं. मात्र त्याने आपला वापर केला असा आरोप शिल्पाने केला होता. त्याला दुसरं कोणीतरी आवडू लागल्याने मला सोडून दिलं, अक्षयने फसवणूक केली, असंही शिल्पा म्हणाली होती. या वक्तव्यानंतर अक्षय आणि शिल्पा कधीही एकत्र दिसले नाहीत. आता ३१ वर्षांनंतर दोघांना एकाच स्टेजवर एकत्र नाचताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी दोघेही एका अवॉर्ड सोहळ्यात गेले होते. तिथे ते समोरासमोर आले आणि मग स्टेजवर पोहोचले. दोघांनी एकत्र परफॉर्म केलं. या दोघांनी अवघे काही सेकंद डान्स केला. दोघांनी सारखेच पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांनी ‘चुरा के दिल मेरा… गोरियां चली’ वर डान्स केला आणि काही वेळातच त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

हुक स्टेप केल्यानंतर अक्षय शिल्पाचा हात पकडतो, त्यानंतर शिल्पा ‘झालं झालं’ म्हणत तिथून बाजूला होते. जवळपास १३ वर्षांनी अक्षय व शिल्पाला एकाच मंचावर एकमेकांबरोबर डान्स करताना पाहून चाहत्यांना यांच्या चित्रपटाची आठवण झाली.

पाहा व्हिडीओ –

‘चुरा के दिल मेरा… गोरियां चली’ हे अक्षय व शिल्पा यांच्या ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं आहे. तब्बल ३१ वर्षांनी या दोघांना पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकताना पाहून चाहत्यांना फार आनंद झाला. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास त्यात अक्षय व शिल्पा मुख्य भूमिकेत होते. तर सैफ अली खान, कादर खान, मुकेश खन्ना, राजेश्वरी, जॉनी लिव्हर, शक्ती कपूर हे कलाकारही होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर मलकानने केले होते.