अभिनेत्री व माजी ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे तिची चर्चा होत असते. लारा दत्ताला ग्लॅमर इंडस्ट्रीत दोन दशकांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपरहिट चित्रपटातून पदार्पण, आईबरोबर अफेअरची अफवा अन् घटस्फोट! ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचा हिरो ते झिरो प्रवास

लाराने २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटातील लाराच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले होते. लारा तिच्या चित्रपटांसाठी जितकी चर्चेत राहिली, तितकीच ती तिच्या अफेअर्समुळेही राहिली. लारा जवळपास ९ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होती. या अफेअरमुळे तिच्या करिअरवरही बराच परिणाम झाला होता.

इन्स्टावर Live येताच MC Stan ने रचला नवा विक्रम; आधी विराट कोहली आता शाहरुख खानलाही टाकलं मागे

लाराचं नाव फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांशी जोडलं गेलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश भूपती लग्न करण्यापूर्वी लारा केली दोरजीच्या प्रेमात होती. केली हा मॉडेल असून दोघांनी एकमेकांना ९ वर्षे डेट केले. त्यांच्या नात्याच्या इतक्या चर्चा झाल्या की, दोघेही लवकरच लग्न करतील, असं वाटत होतं. पण, अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. अभिनेता डिनो मोरियामुळे हे नातं तुटल्याचं म्हटलं जातं. केलीला लारा व डिनोचं अफेअर असल्याची शंका होती, असंही तेव्हा म्हटलं गेलं होतं.

ब्रेकअपनंतर लाराने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले. १६ फेब्रुवारी २०११ रोजी ते लग्न बंधनात अडकले होते. त्यांना २०१२ मध्ये मुलगी सायरा भूपती झाली. खरं तर लाराशी लग्न करण्यापूर्वी महेशचं एक लग्न झालं होतं आणि तो घटस्फोटित होता. त्याची पहिली पत्नी मॉडेल श्वेता जयशंकर होती. लग्नाच्या सात वर्षानंतर दोघे वेगळे झाले होते. नंतर महेशने लाराशी लग्न केलं होतं.

Photos: आधी ख्रिश्चन नंतर हिंदू पद्धतीने हार्दिक-नताशाने बांधली लग्नगाठ; शाही विवाह सोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

अलीकडे लारा फारशा चित्रपटांमध्ये दिसत नाही, परंतू ती कोट्यवधींची मालकीण आहे, शिवाय अजूनही चांगलं कमवते. Facewiki.com च्या रिपोर्टनुसार, लाराची एकूण संपत्ती ८ मिलियन आहे. ती एका चित्रपटासाठी १-२ कोटी रुपये घेते. चित्रपटांव्यतिरिक्त लारा जाहिरातींमधूनही चांगली कमाई करते. तिने आतापर्यंत ‘मस्ती’, ‘काल’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘पार्टनर’, ‘हाउसफुल’, ‘डॉन २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex miss universe lara dutta double dating live in and married to tennis player mahesh bhupathi hrc