बॉलीवूड कलाकार शेफाली शाह, वीर दास व जिम सरभ यांना यंदाच्या ‘एमी पुरस्कार’ सोहळ्याचं नामांकन जाहीर झालं आहे. ‘एमी पुरस्कार’ हा मनोरंजन विश्वातील मानाचा पुरस्कार समजला जातो. याच पार्श्वभूमीवर या तिन्ही कलाकारांनी ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Express Adda Live : एक रंगमंच तीन दिग्गज! शेफाली शाह, वीर दास आणि जिम सरभशी दिलखुलास संवाद, पाहा एक्स्प्रेस अड्डा

शेफाली शाह, वीर दास आणि जिम सरभ यांच्याशी ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ ‘एक्स्प्रेस अड्डा’मध्ये एक्झ्युकेटिव्ह एडिटर अनंत गोएंका संवाद साधला. यापूर्वी या अड्डाला बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री करीना कपूर खान यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”

‘दिल्ली क्राईम’ फेम अभिनेत्री शेफाली शाहला बॉलीवूडचा सगळ्यात मोठा स्टार किंवा यशस्वी कलाकार तुझ्यामते कोण आहे? असा प्रश्न या अड्डामध्ये विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मते शाहरुख खान आजच्या घडीला इंडस्ट्रीत सर्वात मोठा स्टार आहे आणि तो कायम राहणार यात शंका नाही. याशिवाय अमिताभ बच्चन, दिवंगत अभिनेते दिलीप कुमार सर हे दोघेही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेते आहेत.” नव्या पिढीतील कलाकारांबद्दल विचारलं असता शेफाली म्हणाली, “नव्या पिढीमध्ये मी रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं नाव घेईन. पण माझं विचाराल, तर मी स्टार नाही आणि मला स्टार व्हायचं देखील नाही.”

हेही वाचा : “तातडीने तोडगा निघेल अशी…”, मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात रितेश देशमुखचं ट्वीट; म्हणाला, “मराठा समाजातल्या…”

दरम्यान, अभिनेत्रीला ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार’ सोहळ्यात ‘दिल्ली क्राईम’ सीरिजसाठी सर्त्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्रीने वार्तिका चतुर्वेदी या पोलीस अधिकारी असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Express adda live shefali shah reveals who is biggest bollywood star according to her sva 00