Express Adda Live : काजोल आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दो पत्ती’ चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रिती आणि काजोल एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रितीने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी या दोन अभिनेत्री ज ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये सहभागी झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिती आणि काजोल यांच्याशी ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये शुभ्रा गुप्ता संवाद साधत आहेत. पाहा व्हिडीओ…

दरम्यान, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा ‘दो पत्ती’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये काजोल आणि क्रिती यांच्याशिवाय शाहीर शेख, तन्वी आझमी, बृजेन्द्र काला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या दोन अभिनेत्री इंडस्ट्रीतील आव्हानं, करिअर, सध्याचे चित्रपट, पडद्यामागच्या गोष्टी याबद्दल चर्चा करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Express adda live with kajol and kriti sanon do patti movie wacth exclusive interview on indian express sva 00