Express Adda Live : टेलिव्हिजन अकादमीकडून देण्यात येणारा ‘एमी पुरस्कार’ हा मनोरंजन विश्वातील मानाचा पुरस्कार समजला जातो. या सोहळ्यात कलाकार आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञांना सन्मानित करण्यात येतं. सप्टेंबरमध्ये या प्रतिष्ठीत पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली होती. या यादीत शेफाली शाह, वीर दास आणि जिम सरभ या भारतीय कलाकारांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर हे तिन्ही कलाकार आज ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये सहभागी झाले आहेत.

शेफाली शाह, वीर दास आणि जिम सरभ यांच्याशी ‘द इंडियन एस्क्प्रेसच्या’ एक्स्प्रेस अड्डामध्ये एक्झ्युकेटिव्ह एडिटर अनंत गोएंका संवाद साधत आहेत. पाहा व्हिडीओ…

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Amit shah fadnavis
अमित शाह यांचा ठाकरे व शरद पवार गटावर हल्लाबोल; जुन्या मित्रांसाठी भाजपाचे दरवाजे बंदच, पक्षाची भूमिका स्पष्ट

यापूर्वी अभिनेत्री करीना कपूर खान, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हे दोघे एक्स्प्रेस अड्डामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, ‘एमी पुरस्कार २०२३’ मध्ये शेफाली शाहला ‘दिल्ली क्राइम २’ या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात, तर जिम सरभला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन जाहीर झालं आहे. तसेच वीर दासला ‘वीर दास : लॅन्डिंग’ या विनोदी कार्यक्रमासाठी नामांकन जाहीर झालं आहे.

Story img Loader