अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या कामापेक्षाही तिने केलेल्या विधानांमुळे चर्चेत असते. तिची अनेक विधानं ही वादग्रस्त ठरतात. अशातच ती विवाह बंधनात अडकल्याचं तिने आज जाहीर केलं. समाजवादी पार्टीचा नेता फहाद जिरार अहमद याच्याशी स्वराने लग्न केलं आहे. ६ जानेवारी २०२३ रोजीच त्यांनी लग्न केलं आहे. तिचा पती फहाद अहमद याच्याबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करत तिने ही बातमी शेअर केली. आता हा व्हिडीओ फहाद अहमद याने रिट्वीट केला आहे.
स्वरा भास्करने तिचा पती फहाद जिरार अहमद याच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वराने तिच्या पतीबरोबरच्या राजकीय रॅलीमधील झलक दाखवली आहे. तसंच या व्हिडीओमध्ये स्वरानं फहादबरोबर तिची पहिली भेट कशी झाली, पहिला सेल्फी त्यांनी कसा घेतला हे सांगत तिचे आणि फहादचे व्हॉट्सअॅप चॅट्सही दाखवले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघंजण कोर्टात जाऊन मॅरेज पेपरवर सह्या करतानाही दिसत आहेत.
आणखी वाचा : “आता मला कामं मिळणंही बंद झालंय, कारण…”; स्वरा भास्करने व्यक्त केली खंत
हा व्हिडीओ पोस्ट करत स्वराने लिहिलं, “कधीकधी तुम्ही ते जगभर शोधत असता जे तुमच्या अगदी शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली. नंतर आम्हाला एकमेकांची जाणीव झाली. तुझं माझ्या आयुष्यात खूप स्वागत आहे फहाद अहमद.’
हेही वाचा : “विद्या बालनने मला किस…” पूजा भट्टने मौन तोडत केला मोठा खुलासा
आता तिने पोस्ट केलेला हा व्हिडीओ फहादने रिट्वीट केला आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत त्याने लिहिलं, “गोंधळही इतका सुंदर असू शकतो हे मला माहीत नव्हतं. माझा हात हातात घेतल्याबद्दल धन्यवाद लव्ह.” हे म्हणत त्याने स्वरा भास्करला ही टॅग केलं आहे. आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.