अभिनेत्री स्वरा भास्करचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. स्वराच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अभिनय क्षेत्रातील मंडळी, चाहते आणि राजकीय क्षेत्रातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. या सर्वात लक्ष वेधून घेतलं ते तिचा पती फहाद अहमदने केलेल्या ट्वीटने. फहादने ट्वीटमध्ये स्वराला ‘भाऊ’ म्हणत शुभेच्छा दिल्या. पण यावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

“मी मरणाऱ्यांपैकी नाही” म्हणणाऱ्या करण जोहरला कंगना रणौतचा जाहीर इशारा; म्हणाली, “नॅशनल टीव्हीवर…”

स्वरा व फहादने फेब्रुवारीमध्ये त्यांच्या नोंदणी पद्धतीने केलेल्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर मार्चमध्ये दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. फेब्रुवारीमध्ये लग्नाबद्दल माहिती देण्याच्या काही दिवसांपूर्वी फहाद अहमदचा वाढदिवस होता. त्याला शुभेच्छा देताना कंगना त्याला ‘भाऊ’ म्हणाली होती. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं. आता फहादनेही ‘भाऊ’ म्हणत स्वराला शुभेच्छा दिल्या आहेत.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

“दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ, माझ्या वाढदिवशी तू दिलेल्या सल्ल्यामुळे आज मी विवाहित आहे, मला आशा आहे की तुला ट्विटरवरून कळलं असेल. मला प्रत्येक बाबतीत पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद, तुझ्यासारखी मैत्रीण आणि मार्गदर्शक मिळाल्याने मी धन्य झालो आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. P.S-भाऊ जेंडर तटस्थ आहे,” असं फहादने म्हटलं आहे.

दरम्यान, फहादचं स्वराला भाऊ म्हणणं नेटकऱ्यांना फारसं रुचलेलं नाही. कारण अनेकांनी यावरून त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘दोन भाऊ लग्न करतायत, कमाल आहे,’ ‘देव असे भाऊ-बहीण कुणालाच देऊ नये’, ‘आपल्या बायकोला भाऊ म्हणणे हास्यास्पद आहे,’ असं काहींनी म्हटलं आहे.

netizen comment 1
फहादच्या ट्वीटवर युजर्स कॉमेंट्स

“कोणत्याही अर्थहीन गोष्टीचे समर्थन करू नका… फक्त एका जुन्या ट्वीटमध्ये तिने तुमचा “भाई” असा उल्लेख केल्यामुळे आता तुम्ही याला आणखी वाईट स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहात… मला आशा आहे की तुम्ही भविष्यात “बहीण” शब्द वापरून ट्वीट करणार नाही. नाहीतर तटस्थ संबंध म्हणत तुम्ही तेही कराल,” अशा शब्दांत एक युजरने संताप व्यक्त केला आहे.

netizen comment
फहादच्या ट्वीटवर युजर्स कॉमेंट्स

दरम्यान, स्वरा व फहादची ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी स्वराने भाऊ म्हटल्यावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आणि त्यावेळी तिच्या बचावासाठी फहादने ट्वीट केलं होतं.

Story img Loader