अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. स्वराने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. तिने गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी याबदद्लची माहिती चाहत्यांना दिली आणि त्याच दिवशी एंगेजमेंट केली. त्यानंतर फोटो व व्हिडीओही शेअर केले होते. आता स्वराचा पती फहादने ट्विटरवर एंगेजमेंटचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोबरोबरच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वरा भास्करने साखरपुड्यात नेसली आईच्या लग्नातील साडी; ४० वर्षे जुन्या साडीचा फोटो शेअर करत म्हणाली…
“जेव्हा तुम्हाला कळतं की अखेर ते झालं आहे. प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. खरं तर ही सगळी प्रक्रिया सुरू असताना मनाला हुरहूर लागली होती. पण त्याचे परिणाम तुम्हाला आता आमच्या चेहऱ्यावरून वाचता येतील. जेव्हा मी स्वराला कोर्टात नाचण्यापासून रोखण्यात अयशस्वी झालो, तेव्हा मीही तिच्याबरोबर नाचू लागलो. सुखी वैवाहिक जीवनाचे हेच रहस्य आहे, असं मला वाटतं,” असं लिहून अहमदने एंगेजमेंटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यापूर्वी स्वरा भास्करने फहादबरोबरचे आणखी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. दरम्यान, स्वराने या प्रसंगी तिच्या आईची साडी आणि दागिने घातले होते. तर, फहादने नक्षीकाम केलेलं लाल नेहरू जॅकेट आणि कुर्ता घातला होता.
स्वरा व फहादने स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्न केलं आहे. आता दोघेही कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थितीत मार्चमध्ये लग्न करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.