मल्याळम सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता फहाद फासिल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेला फहाद लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. एकापेक्षा एक सुपरहिट मल्याळम सिनेमे देणारा फहाद लवकरच हिंदीमध्ये काम करताना दिसेल, असं म्हटलं जात आहे.

‘अमर सिंग चमकिला’च्या बायोपिकनंतर इम्तियाज अली लवकरच नवीन चित्रपट आणणार आहेत. हा चित्रपट एक प्रेम कहाणी असेल असं म्हटलं जात आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, मल्याळम चित्रपट अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकतो. सध्या फहाद व इम्तियाज यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ते चित्रपटाबद्दल चर्चा करत आहेत. सगळं नीट जुळून आल्यास फहाद या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल.

Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
Ratna Pathak Shah
संदूक: अभिनयाचा श्रीगणेशा
anurag kashyap on kennedy not released
जगभरात गाजलेला ‘केनेडी’ सिनेमा का प्रदर्शित झाला नाही? अनुराग कश्यप नाराजी व्यक्त करत म्हणाला….

कृष्णा अभिषेकच्या वडिलांनी ‘या’ कारणाने कधीच सूनेला स्वीकारलं नाही; कश्मीरा म्हणाली, “मी हॉट, सेक्सी होते अन्…”

पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इम्तियाज अली त्याच्या पुढील चित्रपटासाठी फहाद फासिलला घेण्याचा विचार करत आहे. गेल्या काही महिन्यांत दोघांच्या अनेक भेटी झाल्या आहेत. चित्रपट आणि कथेबाबत त्यांच्यात एकमत आहे, असं म्हटलं जात आहे. इम्तियाजच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे ही देखील एक प्रेमकथा असेल. इम्तियाजने या चित्रपटासाठी फहादशी संपर्क साधला कारण त्याला तो या चित्रपटासाठी योग्य अभिनेता वाटत आहे, आता चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू आहे अशीही माहिती समोर आली आहे.

पहिलं लग्न मोडल्यावर वयाने लहान कृष्णाच्या प्रेमात पडली होती कश्मीरा शाह, अभिनेत्री ५२ वर्षांची, तर पती फक्त…

इम्तियाजला २०२५ च्या पहिल्या तिमाहीत या चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे आहे. सध्या तो चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. लवकरच तो चित्रपटाचे संगीत आणि प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

fahadh faasil
अभिनेता फहाद फासिल (फोटो – फॅनपेजवरून साभार)

फहद फासिलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की विशाल भारद्वाज यांनी त्याला ५-६ वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटाची ऑफर दिली होती. त्याने त्या चित्रपटात काम करण्यास होकारही दिला होता. पण नंतर विशालने तो चित्रपट दुसऱ्या अभिनेत्यासह केला. याच मुलाखतीत फहादने इम्तियाज अलीचे कौतुक केले होते. इम्तियाजचा चमकिला चित्रपट खूप आवडला होता, असं तो म्हणाला होता.

महाराष्ट्राचा जावई आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, ऑन-स्क्रीन वहिनीच्या प्रेमात पडला अन् कुटुंबाचा विरोध पत्करून मंदिरात केलेलं लग्न

फहाद फासिल शेवटचा ‘आवेशम’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. लवकरच तो रजनीकांत यांच्याबरोबर ‘वेट्टियन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १- ऑक्टोबरला रिलीज होईल. त्यानंतर त्याचा ‘पुष्पा २’ येईल, ज्यामध्ये तो अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

Story img Loader