आपल्या देशात बरेच घोटाळे होतात त्यापैकी फार कमी घोटाळे उघडकीस येतात. असाच एक मोठा क्रेडिट कार्ड घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीज तसेच क्रिकेटर्सची नावंदेखील समोर आली आहेत. सेलिब्रिटीजच्या जीएसटी नंबरच्या सहाय्याने त्यांचे पॅन कार्ड डिटेल्स काढून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड फ्रॉड केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे.

या सेलिब्रिटीजच्या नावावर फीनटेक कंपनी ‘वन कार्ड’ या कंपनीची क्रेडिट कार्ड मागवण्यात आली होती. कंपनीला याबद्दल माहिती मिळाली तोपर्यंत या वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून २१.३२ लाखांची खरेदी करण्यात या लोकांना यश मिळालं. ही माहिती समोर येताच कंपनीने ताबडतोब दिल्ली पोलिसात तक्रार केली आणि चौकशी केल्यानंतर पोलीसांना ५ लोकांना अटक करण्यात यश मिळालं आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

आणखी वाचा : सध्याच्या तरुण पिढीबद्दल कंगना रणौतच परखड मत; म्हणाली “यांचं ब्रेन वॉश करणं…”

या प्रकरणात अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, अलिया भट्ट, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनीसारख्या बड्या लोकांची नावं समोर आली आहेत. यांच्या नावावर फेक आयडी प्रूफ तयार करून हा सगळा घोटाळा करण्यास आल्याचं स्पष्ट झालं आहे. शाहदरा परिसराचे डेप्युटी पोलीस कमिशनर रोहित मीना यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहे त्यामुळे याबद्दल जास्त माहिती देणं आत्ता शक्य नाही.” पाचही आरोपींची नावं दिल्ली पोलीसांनी जाहीर केली आहेत.

क्रेडिट कार्ड कंपनीने पोलीसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की ही एक पुणे स्थित फीनटेक कंपनी आहे जी ‘वन कार्ड’ नावाने क्रेडिट कार्ड पुरवते, खरंतर हे एक मेटल कार्ड आहे. या आरोपींना या घोटाळ्यातून तब्बल १० लाखांचं क्रेडिट लिमिटसुद्धा मिळालं होतं. हा एकूणच प्रकार आता उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजलेली आहे.

Story img Loader