रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्याकडे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांमधील खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री कमालीची आहे. २०१२मध्ये रितेश व जिनिलीया विवाहबंधनात अडकले. या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. रितेश व जिनिलीयाच्या लग्नाला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहे. दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे प्रत्येक व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतं.

‘तुझे मेरी कसम’ हा या दोघांचा पहिला एकत्रित चित्रपट. या चित्रपटानिमित्ताने रितेश व जिनिलीया यांना एकमेकांना ओळखण्याची संधी मिळाली. काही वर्षे एकमेकाला डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नापूर्वी या दोघांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता असं बोललं जात होतं.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

आणखी वाचा – ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने पायासाठी खर्च केले ‘इतके’ लाखो रुपये, आर्थिक परिस्थिती सुधारली, म्हणाला, “शस्त्रक्रिया झाली आणि…”

पण खरंच या दोघांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता का? याबाबत रितेशने खुलासा केला आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेशला त्याच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “जिनिलीया व तुझ्या नात्याला कुटुंबियांचा विरोध होता हे खरं आहे का?” असं रितेशला विचारण्यात आलं.

आणखी वाचा – नाशिकची भावी आमदार, खासदार होण्यास सायली संजीव तयार? राजकारणाबद्दल म्हणाली, “मला…”

यावर रितेश म्हणाला, “अजिबात नव्हता. आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, आपली गाडी रुळावर आहे की नाही हे मलाच काही वर्ष माहीत नव्हतं. आमच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध कधीच नव्हता. आम्ही वर्षा बंगल्यावर जेव्हा राहत होतो तेव्हा जिनिलीया तिथेही येत होती. वर्षानंतर वरळीला आम्ही राहायला गेलो. तिथे जिनिलीया यायची”. जिनिलीया तर विलासराव देशमुख यांच्याही खूप जवळ होती. याबाबत तिने स्वतः बऱ्याच मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे.