बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, खिलाडीप्रमाणे बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. नुकताच त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. आजवर अक्षयने बरेच चित्रपट सुपरहिट करून दाखवले आहेत मात्र तितकेच फ्लॉप चित्रपटदेखील दिले आहेत. फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची जबाबदारीदेखील त्याने घेतली आहे. त्याच्या कृतीवरच एका प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
राजतवा दत्त हे बंगालमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. अक्षय कुमारबद्दल ते बोलताना असं म्हणाले, अक्षय त्याच्या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी घेत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्यात हिंमत लागते हे सांगायला की चित्रपट चालत नाहीत. तो म्हणाला ते बरोबर आहे प्रत्येक चित्रपट फ्लॉप होण्यावर तुम्ही प्रेक्षकांना दोष देऊ शकत नाही. कुठेतरी चित्रपटांमध्ये काहीतरी चुकत असणार, इंडस्ट्रीने याची दाखल घेतली पाहिजे की कुठेतरी काहीतरी चुकत आहे.
“इतरांचं टॅलेंट विकून…” शैलेश लोढांनी ‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांना लगावला अप्रत्यक्ष टोला
ते पुढे म्हणाले, “तुमचे चित्रपट ओळीने पडत असतील तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ही वेळ तुम्हाला बदलावी लागणार आहे. मी माध्यांनी जे सेल्फी चित्रपटाचे आकडे बघितले त्यावरून असं दिसत आहे की प्रेक्षकांची रुची बदलली आहे. त्यामुळे तुम्हालादेखील बदलावे लागणार आहे. जर तुम्ही वाईट काळातून जात असाल तर तुम्हाला बदलावे लागेल कारण तुमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून काहीतरी वेगळं अपेक्षित आहे जर तुम्ही ते केलं नाहीत तर कठीण आहे. “अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा हा सलग पाचवा चित्रपट आहे. याआधी अक्षयचे ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेले नाहीत. १५० कोटींचं बजेट असलेल्या ‘सेल्फी’ चित्रपटाला अपेक्षेपेक्षा फारच कमी यश बॉक्स ऑफिसवर मिळालं आहे.