बॉलिवूडवर सतत टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा कायम चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. मध्यंतरी त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्विट केआरकेने केलं होतं. ट्विटप्रकरणी खान याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. मात्र नंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने जामीनावर त्याची सुटका केली आहे.

सुटका झाल्यावर केआरकेने यापुढे कोणत्याही चित्रपटाचं समीक्षण तो करणार नाही असं जाहीर केलं होतं. पण बाहेर पडताच त्याने हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचं परीक्षण केलं आणि त्याने या चित्रपटावर भरपूर तोंडसुख घेतलं. यानंतरही त्याने सैफ आणि हृतिक यांना टॅग करत त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. आता तर त्याने आपल्याला जेलमध्ये मारून टाकायचा कट रचला होता असं स्पष्ट करत बॉलिवूडवर आरोप केले आहेत.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

आणखी वाचा : रकुल प्रीत विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीने ट्वीट करत केला खुलासा

केआरकेने पुन्हा ‘विक्रम वेधा’बद्दल भाष्य करत ट्वीट केलं आहे आणि त्याने यामधून हृतिकच्या आगामी चित्रपटावरदेखील भाष्य केलं आहे. केआरके त्याच्या ट्वीटमध्ये म्हणतो, ” प्रिय हृतिक, विक्रम वेधा फ्लॉप होणार हे मी आधीही बोललो होतो. याप्रमाणेच तुझा आगामी ‘फायटर’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणकून आपटेल हेदेखील मी सांगू शकतो. यावर तुला काय म्हणायचं आहे का? आहे की नाही मी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्तम समीक्षक?”

केआरकेने या ट्वीटमधून हृतिकला याचं उत्तर देण्यास उद्युक्त केलं आहे. त्याच्या या ट्वीटला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. काही चाहत्यांनी त्याचं म्हणणं योग्य असल्याचं म्हंटलं आहे तर काही नेटकऱ्यांनी ‘२ रुपयांचा समीक्षक’ म्हणत त्याला हिणवलं आहे. केआरकेच्या या ट्वीटला हृतिक उत्तर देईल ही शक्यता फार कमी आहे. एकंदरच जामीनावर सुटूनही केआरके बॉलिवूडविषयी त्याचं मत आणखी निर्भीडपणे व्यक्त करू लागला आहे.

Story img Loader