Krish Jagarlamudi married to Dr Priti Challa : प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शकाने हैदराबादमधील एका डॉक्टरशी दुसरं लग्न केलंय. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश जगरलामुडीने ११ नोव्हेंबर रोजी गुपचूप दुसरं लग्न उरकलं. त्याने हैदराबादमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रिती चल्लाशी अत्यंत साधेपणाने लग्न केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. प्रितीच्या टीमने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि या जोडप्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. क्रिशने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी निवडली. तर, प्रितीने पिवळ्या रंगाची पट्टू साडी नेसली आहे. त्यावर तिने मॅचिंग दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला. या जोडप्याने खासगी समारंभात लग्नगाठ बांधली.

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

पाहा व्हिडीओ –

डॉ. प्रिती व क्रिश यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रृती हासन, अनुष्का शेट्टी, बॉबी देओल, लावण्या त्रिपाठी यांनी या पोस्टवर कमेंट्स करून या जोडप्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्का शेट्टीने पोस्ट करून क्रिश व डॉ. प्रितीला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

दोन वर्षात मोडलं पहिलं लग्न

४६ वर्षीय क्रिशचं हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न राम्या वेलागाशी झालं होतं. २०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं, पण दोन वर्षांनी २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दुसऱ्या घटस्फोटानंतर सहा वर्षांनी क्रिशने डॉ. प्रिती चल्लाशी दुसरं लग्न केलं आहे.

हेही वाचा – “तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

क्रिशचे चित्रपट

क्रिशच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो पवन कल्याण, अनुष्का शेट्टी यांच्या ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तो अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या सिनेमातून त्याने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिशने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं. ‘कांचे’, ‘गौतमीपूत्र सत्कर्णी’, ‘वेदम’, ‘कोंडापोलमन, वानम’, ‘एनटीआर कथानायकुडू’, ‘क्रिष्णम वंदे जगतगुरुम’, ‘गब्बर इज बॅक’ हे त्याने दिग्दर्शित केलेले इतर चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous director krish jagarlamudi married to hyderabad doctor dr priti challa video viral hrc