अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) भाऊ सिद्धार्थ चोप्रा त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे. सिद्धार्थ व नीलम यांच्या लग्नाआधीचे सोहळे सुरू आहेत. लाडक्या भावाच्या लग्नासाठी देसी गर्ल प्रियांका पती निक जोनास व लेक मालतीबरोबर भारतात आली आहे. भावाच्या मेहंदी समारंभ, हळदी व संगीत समारंभातील फोटो व व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. प्रियांकाच्या भावाचा संगीत सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्याला एक मराठमोळ्या अभिनेत्रीने हजेरी लावली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ चोप्रा व नीलम उपाध्याय यांच्या संगीत सोहळ्याला पाहुण्यांची मांदियाळी होती. मनारा चोप्रा, तिची बहीण मिताली, तिचे आई-वडील तसेच परिणीती चोप्राचे आई-वडील याठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही अभिनेत्री म्हणजे अनुषा दांडेकर होय. अनुषा सिद्धार्थ व नीलमच्या संगीत सोहळ्यात पोहोचली होती.
अनुषाने या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. लाँग स्कर्ट आणि डिझायनर क्रॉप टॉपमध्ये अनुषा खूपच सुंदर दिसत होती. अनुषाने त्यावर मॅचिंग कानातले घातले होते आणि लूकला साजेसा मेकअप केला होता. अनुषाचा हा व्हिडीओ वूम्प्ला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ –
अनुषाचा हा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनुषाच्या या व्हिडीओवर रेड चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत.
![anusha dandekar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/anusha-dandekar.jpg?w=272)
दरम्यान, सिद्धार्थ चोप्राबद्दल बोलायचं झाल्यास तो प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ आहे. सिद्धार्थचा पाच वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता, पण तो मोडला. त्यानंतर सिद्धार्थ नीलम उपाध्यायला डेट करू लागला. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व नीलम यांनी एप्रिल २०२४ मध्ये साखरपुडा केला आणि आता जवळपास १० महिन्यांनंतर ते लग्न करत आहेत. नीलम ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याने त्यांच्या लग्नाला बॉलीवूडसह दक्षिणेतील काही कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे.