Darshan Raval Married to Dharal Surelia : ‘लव्हयात्री’ मधील चोगाडा’ आणि ‘इश्क विश्क रिबाउंड’ मधील ‘सोनी सोनी’ सारख्या गाण्यांचा गायक दर्शन रावल लग्नबंधनात अडकला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दर्शनने त्याची बेस्ट फ्रेंड धरल सुरेलिया हिच्याशी एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
दर्शन रावलने इन्स्टाग्रामवर ‘माय बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ असं कॅप्शन देत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सर्व फोटोंमध्ये दर्शन व धरल दोघेही हसत लग्नाच्या विधी करताना दिसत आहेत. दर्शन रावलने लग्नात आयवही रंगाची शेरवानी घातली होती, तर त्याच्या पत्नीने, धरलने पारंपरिक लाल लेहेंगा निवडला होता. या कपड्यांबरोबर मॅचिंग दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला होता. पारंपरिक पद्धतीने दोघांचं लग्न झालं. लग्नात दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
हेही वाचा – मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! बॅलचर पार्टीचे फोटो चर्चेत, बॉयफ्रेंडशी लवकरच करणार लग्न
पाहा पोस्ट –
दर्शनने लग्नाचे फोटो पोस्ट केल्यावर चाहते व त्याचे मित्र-मैत्रिणी कमेंट्स करत आहेत. सर्वजण दर्शन व धरलचं आयुष्यातील नवीन प्रवासासाठी अभिनंदन करत आहेत. तसेच लग्नात दोघेही सुंदर दिसत असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.
हेही वाचा – राज बब्बर यांच्या कुटुंबाला करायचं होतं नादिराचं धर्मांतर; मुलीचा खुलासा, म्हणाली, “फक्त एका ख्रिश्चन…”
दर्शन रावल तरुणाईत खूप लोकप्रिय आहे. ११ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये ‘इंडियाज रॉ स्टार’च्या पहिल्या सीझनमध्ये दर्शन रावल स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तो हा शो जिंकू शकला नव्हता. पहिल्या पर्वाचा विजेता ओडिशाचा ऋतुराज मोहंती ठरला होता. ऋतुराजकडून हरलेल्या दर्शनची या शोमध्ये गायलेली गाणी खूप गाजली होती. त्या शोमुळे त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला.
या शोने दर्शनला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याने बॉलीवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१५ मध्ये त्याने हिमेश रेशमियाचे आभार, जो शोचा जज होता. ‘लव्हयात्री’मधील ‘चोगाडा’ हे गाणं दर्शनने गायलं होतं. त्याचं हे गाणं खूप गाजलं होतं. आजही त्याचं हे गाणं अनेकदा ऐकायला मिळतं, इतकं ते लोकप्रिय झालं होतं. यानंतर त्याने ‘शेरशाह’ मधील ‘कभी तुम्हे’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील ‘ढिंडोरा बाजे रे’ आणि इश्क विश्क रिबाउंड मधील ‘सोनी सोनी’ यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याने अनेक गुजराती गाणीदेखील गायली आहेत.