शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. चित्रपटातील गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करायचीही मागणी होत आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख आणि या चित्रपटातील कलाकारांनी यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनची पद्धत बदलली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.

आणखी वाचा : ‘RRR’ पाहून भारावलेल्या जेम्स कॅमेरून यांनी दिली राजामौलींना ऑफर; म्हणाले, “हॉलिवूडमध्ये चित्रपट…”

या सेशनमध्ये बऱ्याच लोकांनी शाहरुखला चित्र विचित्र प्रश्न विचारले आणि शाहरुखने त्यापैकी काही लोकांना ट्विटरवर उत्तरं दिली आहेत. एका ट्विटर युझरने शाहरुखला असाच एक विचित्र प्रश्न विचारला. शाहरुखला टॅग करत त्याने विचारलं की, “मला गर्लफ्रेंड नाहीये, तर मग मी कोणाबरोबर ‘पठाण’ बघू?” यावर शाहरुखने त्याच्या शैलीत उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, “आत्ता चित्रपट बघ, गर्लफ्रेंड शोधायला पूर्ण आयुष्य पडलंय.” शाहरुखच्या या ट्विटवरसुद्धा लोकांनी मस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून पटापट शोज हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. याच दीपिका पदूकोण अॅक्शन मोडमध्ये आणि जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan ask strange question to shahrukh in ask srk session actor responds in his witty manner avn
Show comments