शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही जण या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. पण तसं जरी असलं तरी शाहरुख खान आणि ‘पठाण’बद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेली क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच शाहरुखने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ या प्रश्न-उत्तरांच्या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या नवजात लेकीचं नाव ठेवण्याची विनंती केली. त्याच्या या प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शाहरुखने ट्विटरवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी एका चाहत्याने त्याला म्हटलं होतं की, “आम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल त्याचं नाव तूच ठेव. प्लीज मला दोन्ही नावं सांग.” तेव्हा शाहरुखनेही या ट्वीटला उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, “आधी तुम्हाला बाळ होऊ दे मग त्याचं नाव ठरवू. पण तुझं आणि तुझ्या पत्नीचं अभिनंदन. तंदुरुस्त रहा.” आता शाहरुखच्या या चाहत्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आता पुन्हा एकदा त्याने ट्विट करत त्याच्या लेकीसाठी नाव सुचवण्याची विनंती किंग खान केली.

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”
What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : “पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं; आम्हाला..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

आणखी वाचा : “आमच्या होणाऱ्या बाळाचं नाव तू ठेव…” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर, म्हणाला, “तुम्हा दोघांना…”

शाहरुखने आज त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ‘आस्क एसआरके’ हे प्रश्न उत्तरांचं सेशन घेतलं. या सेशनच्या वेळी त्याच्या या चाहत्याने ट्वीट करत त्याला म्हटलं, “आज सकाळी नऊ वाजता आम्हाला मुलगी झाली. तिचं नाव तू ठेवायचं. प्लीज तिचं नाव ठेव.” त्याच्या या ट्विटला शाहरुखनेही आनंदाने उत्तर दिलं. या ट्वीटला रिप्लाय देत शाहरुख म्हणाला, “किती छान! देवाचे आशीर्वाद तिच्यावर कायम राहोत.” आता त्याने दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : “तू आता रिटायरमेंट घे,” नेटकऱ्याच्या सल्ल्यावर शाहरुख खानचं चोख उत्तर, म्हणाला…

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader