शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र शाहरुख नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सोशल मीडियाद्वारे शाहरुख चाहत्यांशी संवाद साधत आहे. नुकतचं त्याने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये शाहरुख खानने चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितलं. यावेळी त्याच्याशी संवाद साधण्याची संधी चाहत्यांना मिळाली. एकापेक्षा एक भन्नाट प्रश्न यावेळी शाहरुखला विचारण्यात आले. यावेळी त्यानेही काही मोजक्याच प्रश्नांची मजेशीर उत्तर दिलं. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

शाहरुख खानची पहिली गर्लफ्रेंड कोण?

दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारला. “तुझी पहिली गर्लफ्रेंड कोण होती?” असा प्रश्न शाहरुखला त्याच्या चाहत्याने विचारला. यावर शाहरुखनेही अगदी स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला, “माझी बायको गौरी.” शाहरुखच्या या उत्तरानं सगळ्यांचीच मनं जिंकली.

पहिल्याच गर्लफ्रेंडबरोबर शाहरुखने लग्न केलं. १९९१मध्ये गौरी व शाहरुख विवाहबंधनात अडकले. बऱ्याच मुलाखतीमध्ये तो गौरीवर त्याचं किती प्रेम आहे याबाबत बोलताना दिसतो. शाहरुख चार वर्षांनी ‘पठाण’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसह त्याची असलेली केमिस्ट्री पाहण्यासही चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans ask question to shahrukh khan who is your first girlfriend know the answer see details kmd