‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पण आता प्रेक्षक या चित्रपटावर नाराज झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गदर २’ चित्रपटाबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या चित्रपटात इतर भूमिकांमध्ये कोण कलाकार दिसणार हे देखील समोर आलं आहे. पण या चित्रपटातील कलाकारांची अधिक माहिती कळल्यावर प्रेक्षकांची निराशा झाली आहे आणि ते नाराजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : Gadar 2 teaser: जबरदस्त डायलॉग, सनी देओलची खास झलक; ‘गदर २’चा टीझर प्रदर्शित, पण…

याचं मुख्य कारण म्हणजे या चित्रपटात सनी देओलच्या सूनेची भूमिका अभिनेत्री सिमरत कौर साकारणार आहे. तर सिमरतचा जोडीदार म्हणून अभिनेता उत्कर्ष शर्मा याला कास्ट करण्यात आलं आहे. उत्कर्ष या चित्रपटात सकीनाच्या मुलाची भूमिका साकारताना दिसेल. नेटकरी त्याच्या कास्टिंगबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, पण सनी देओलच्या सुनेच्या भूमिकेत सिमरत कौरची निवड करण्यात आल्याबद्दल नेटकरी नाराज झाले आहेत. यापूर्वी तिने केलेल्या एका चित्रपटामध्ये तिने बोल्ड सीन्स दिले.

हेही वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सनी देओलचे चाहते आहोत पण पण सिमरतच्या या आधीच्या बोर्ड अंदाजामुळे सनीच्या कार्याला ठेच पोहोचत आहे. दरम्यान, ‘गदर २’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans get angry over casting of gadar 2 film and trolled actress simrat kaur rnv