शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’च्या पहिल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद सुरू असतानाच आता या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं प्रदर्शित होऊन तीन तासही झाले नाहीत त्याआधीच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीने सर्वांचे लक्ष वेधलं. आता या दुसऱ्या गाण्यामुळे एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा होत आहे.

‘बेशरम रंग’प्रमाणेच ‘झुमे जो पठाण’ हे गाणं हे शाहरुख आणि दीपिकावर चित्रित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. शाहरुख खानने या गाण्याचा एक टीझर सोशल मीडियावर पोस्ट करत हे गाणं प्रदर्शित झाल्याची बातमी चाहत्यांना सांगितली. त्यावर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. या गाण्यापेक्षाही एका वेगळ्याच गोष्टीकडे नेटकरी जास्त आकर्षित झाले आहेत.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
possibilities of BJP lose five seats in Marathwada because of ajit pawar NCP
मराठवाड्यात भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
Rape of minor girls in Vasai and Nalasopara
Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे

आणखी वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

हे गाणं अरिजित सिंगने गायलं आहे. तर त्याचप्रमाणे शाहरुख आणि दीपिकावर चित्रित झालेल्या या गाण्यात ती दोघंही थिरकताना दिसत आहेत. या गाण्यातली त्यांची केमिस्ट्री आणि त्यांचा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

हेही वाचा : ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

शाहरुखने पोस्ट केलेल्या या गाण्याच्या टीझरवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेक जणांनी कमेंट करत हे गाणं आणि दीपिका आणि शाहरुख यांची केमिस्ट्री खूप आवडल्याचं सांगितलं आहे. तर अनेकांनी त्या दोघांचा डान्स आणि त्यांचा हटके लूक यांनी त्यांना भुरळ घातल्याचं सांगितलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.