बॉलीवूडची अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात साराबरोबर अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, सारा अली खान विकी कौशलबरोबर आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. या सामन्यादरम्यान साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी साराला शुबमन गिलचे नाव घेत ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- आमिर खानच्या चित्रपटात काम करण्यास सलमान खानचा नकार; ‘हे’ कारण आलं समोर

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर

आयपीएल-२०२३ च्या अंतिम सामन्यात ‘चेन्नई सुपर किंग्स’ने ‘गुजरात टायटन्स’चा पराभव करीत विजेतेपद पटकावले. या सामन्याला बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांनीही हजेरी लावली होती. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल विजेतेपदावर नाव कोरल्यावर विकी-साराने जल्लोष केला. अंतिम चेंडूवर चौकार मारत चेन्नईने कसा सामना जिंकला याचा व्हिडीओ या दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये साराला जल्लोष करताना पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करीत “सारा दीदी बेवफा है” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे पैसे कापा…, “हे दोघेही संपूर्ण सामना संपेपर्यंत गुजरातला पाठिंबा देत होते, आता फक्त नाटक करीत आहेत.” अशा कमेंट केल्या आहेत.

खरं तर सारा अली खान आणि शुबमन गिल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्यांच्या अफेअरची चर्चाही सुरू झाली होती. तर अलीकडेच सारा अली खान आणि शुबमनने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात काही तरी बिनसल्याच्याही चर्चा सुरू होत्या.

हेही वाचा- “एकमेकांना मारण्याची इच्छा होते अन्…” शबाना आझमींचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “आमच्यामध्ये…”

दरम्यान, विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोघेही सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. चित्रपटात राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader