प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खानने शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटात झायेद खान, सुष्मिता सेन, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांसारखे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत होते. फराहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्यांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यात आलेल्या आव्हानांबद्दल खुलासा केला आहे.

या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी फराह खानला बऱ्याच समस्या आल्या. याबद्दलच तिने मॅशेबल इंडियाच्या ‘द बॉम्बे ड्रीम शोम’ध्ये कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्याशी संवाद साधताना खुलासा केला. शाहरुखने एका झटक्यात तिच्या चित्रपटाला होकार दिला, पण इतरांचं कास्टिंग करताना मात्र फराहला खूपच त्रास झाला. झायेद खानच्या भूमिकेसाठी याआधी हृतिक रोशन, अभिषेक बच्चन व सोहेल खान यांना विचारण्यात आलं होतं अन् अमृता रावच्या भूमिकेसाठी प्रथम आयेशा टाकीया ही फराहची पहिली पसंती होती. हे तिने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.

Saba Azad
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Movie Villain, Taklu Haiwan , Solapur ,
कधी कधी खलनायक व्हावे लागते!
Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”

आणखी वाचा : ‘गली बॉय’च्या कथेबद्दल रॅपर नेझीने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दोन पत्नी…”

या चित्रपटातील खलनायक म्हणजेच राघवन या पात्रासाठी कोणाला घ्यायचं हादेखील फराहसमोर एक मोठा प्रश्न होता. या भूमिकेसाठी शाहरुखच्या आग्रहाखातर फराहने कमल हासन यांनाही विचारलं होतं, शाहरुखच्या चित्रपटाला ते नकार देणार नाहीत असा विश्वास खुद्द शाहरुखलाच होता, परंतु घडलं ऊलटच. कमल हासन यांनी मात्र ही भूमिका करण्यास नकार दिला.

याबद्दल बोलताना फराह म्हणाली, “मै हूं नामधील सुनील शेट्टीच्या भूमिकेसाठी बड्याबड्या कलाकारांनी नकार दिला होता. नसीरुद्दीन शाह यांनी नकार दिला होता, शाहरुखच्या सांगण्याखातर मी नंतर कमल हासन यांनाही या भूमिकेसाठी विचारलं, शाहरुख मला म्हणाला होता की कमल सर त्याच्यावर खूप प्रेम करतात, त्यांनी एकत्र ‘हे राम’मध्ये काम केलं आहे. ते नक्की ही भूमिका करतील, पण कमल सरांनी माझा दिवसभर वेळ घेतला अन् शेवटी मला नकार दिला. त्यानंतर मी ही भूमिका घेऊन नाना पाटेकर यांच्याकडे गेले पण त्यांनीही मला तब्बल एका आठवड्याने नकार दिला.”

पुढे फराह म्हणाली, “नाना यांनी मात्र मला काही चांगले सल्ले दिले. या खलनायकाची पार्श्वभूमी दाखवण्याचा सल्ला मला त्यांनी दिला. आम्हाला त्यावेळी एक मोठा आणि प्रसिद्ध चेहेरा हवा होता. त्यानंतर आम्ही सुनील शेट्टीकडे गेलो आणि त्याने तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. त्यांना मी त्यांच्या लूकचे काही फोटोज दाखवले तर त्यांना फार आनंद झाला अन् ते हा चित्रपट करण्यासाठी फार उत्सुक होते.”

Story img Loader