२०२२ वर्ष कार्तिक आर्यनसाठी फार लकी ठरलं आहे. या वर्षामध्ये त्याचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. या चित्रपटामुळे त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. नुकताच त्याच्या ‘फ्रेडी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. अल्लू अर्जुनच्या ‘आला वेंकटपुरम’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये, ‘शहजादा’ चित्रपटामध्ये तो झळकणार आहे. पुढच्या वर्षी त्याचे ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ असे दोन बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून तो खूप व्यग्र आहे.

कार्तिक त्याच्या चाहत्यांचा खूप लाडका आहे. जो जेथे जातो, त्या जागी त्याचे चाहते त्याला भेटायला येतात. काही दिवसांपूर्वी त्याचा चाहत्यांबरोबरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. कार्तिक सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमाद्वारे तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. रविवारी त्याने एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये त्याच्यासमोर नूडल्स, सूप असे दोन-तीन चायनीज खाद्यपदार्थ आहेत असे दिसते. त्याने या पदार्थांबरोबरच्या सेल्फीला “कोण म्हणतं डाएट फूड चविष्ट नसतं”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – फवाद खानच्या ‘या’ पाकिस्तानी चित्रपटाने ब्रिटनमध्ये ‘RRR’ला पछाडले; निर्मात्यांच्या घोषणेवर भारतीय चाहते म्हणाले…

हे विनोदी कॅप्शन वाचून त्याच्या चाहत्यांनी फोटोखाली कमेंट्स केल्या आहेत. दिग्दर्शिका फराह खानने सुद्धा या फोटोखाली कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. तिने हसायचे इमोजी जोडत तेथे “तुझ्यासमोरचे पदार्थ डाएट फूड वाटत नाहीयेत”, अशी कमेंट केली आहे. त्याच्या एका चाहत्याने कमेंटबॉक्समध्ये ‘भावा आम्हाला पण थोडस पाठवतो का?’, असे लिहिले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने त्याला ‘कॅप्शन किंग’ ही पदवी बहाल केली.

आणखी वाचा – “मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे…” गटारात राहिल्यासारखे वाटतंय म्हणाणाऱ्या जुही चावलाच्या ट्वीटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

त्याच्या बऱ्याचशा चित्रपटांची निर्मिती टी सीरिजने केली आहे. ‘भूल भुलैया २’ सुद्धा त्यांचीच निर्मिती आहे. या निर्मिती संस्थेच्या सुप्रसिद्ध ‘आशिकी’ फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागामध्ये ‘आशिकी ३’ मध्ये कार्तिक आर्यनची वर्णी लागल्याची घोषणा टी सीरिजचे अध्यक्ष भूषण कुमार यांनी केली आहे.