२००७ रोजी प्रदर्शित झालेला फराह खानचा ‘ओम शांती ओम’ चित्रपट अजूनही लोकप्रिय आहे. शाहरुख खान अभिनीत या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारत दीपिका पदुकोणने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. कथानक, संवाद व गाण्यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यावेळी ‘ओम शांती ओम’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. परंतु, ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दीपिका पदुकोणला फक्त शाहरुख खानमुळे संधी मिळाल्याचे दिग्दर्शिका फराह खानने सांगितले.
कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्याशी संवाद साधताना फराह म्हणाली, “नवोदित कलाकारांना केव्हाही संधी मिळू शकते; परंतु तुम्ही या संधीसाठी तयार आहात की नाही हे तुम्हाला माहीत असायला हवं. सगळे जण म्हणतात की, योग्य भूमिका मिळेपर्यंत वाट पाहावी. पण, मला असं वाटतं की, ते दिवस गेलेत आता. लहान-मोठं काम असलं तरी तुम्ही अभिनय करीत राहिलं पाहिजे. तुम्ही स्टारकिड असल्याशिवाय तुम्हाला कोणीही मोठी संधी देणार नाही. सॉरी! पण हेचं सत्य आहे.”
हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”
जेव्हा मुकेश छाबरा यांनी फराह खानला विचारले, “दीपिका पदुकोणसारख्या नवोदितांनाही तुम्ही संधी दिली आहे.” तेव्हा फराह म्हणाली, “मी दीपिकाला संधी दिली. कारण- नायकाच्या भूमिकेत शाहरुख खान होता आणि शाहरुखमुळेच मी ती जोखीम पत्करू शकले.”
हेही वाचा… अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चेहरा लपवत आले माध्यमांसमोर; नेटकरी म्हणाले, “असं कामच का…”
दरम्यान, ‘ओम शांती ओम’ चित्रपटात किरण खेर, श्रेयस तळपदे, अर्जुन रामपाल, युविका चौधरी यांच्याही निर्णायक भूमिका होत्या. ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर फराह खानने २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाबरोबर पुन्हा काम केले. तर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या पठाण आणि जवान या चित्रपटांमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने एकत्र काम केले.