Farah Khan Mother Death: सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी (२६ जुलैला) मुंबईत निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मेनका काही दिवसांपासून आजारी होत्या. नुकतंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अहवालांनुसार, याआधीही मेनका इराणी यांना एकदा नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर आता त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी समोर आली आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

पाकिस्तानी महिला नेत्याबरोबरचा मुकेश अंबानी यांचा फोटो व्हायरल, तिच्या पतीने कॅप्शनमध्ये लिहिलं…

मेनका इराणी या डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहिणी होत्या. मेनका यांनी १९६३ साली आलेल्या ‘बचपन’ या सिनेमात अभिनेत्री म्हणूनही काम केलं होतं. यात सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान देखील होते. मेनका यांनी चित्रपट निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं होतं.

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

मेनका इराणी यांचा दोन आठवड्यांपूर्वीच ७९ वा वाढदिवस झाला. फराह खानने सोशल मीडियावर आईबरोबरचे फोटो शेअर केले होते. “आपण सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो, खासकरून मी! मी माझी आई मेनकावर किती प्रेम करते याची जाणीव मला झाली. ती मी पाहिलेली सर्वात धाडसी व्यक्ती आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई,” असं कॅप्शन तिने लिहून पोस्ट केली होती.

तिशा कुमारच्या अंत्यसंस्कारानंतर स्मशानातून हसत बाहेर पडला बॉलीवूड अभिनेता; संतापलेले नेटकरी म्हणाले, “मृत्यूचा तमाशा…”

फराहचे वडील कामरान खान यांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं होतं, असं अनेकदा तिने सांगितलं आहे. “मी एका फिल्मी कुटुंबातील आहे, पण मी पाच वर्षांचे होते तोपर्यंत आम्ही खूपच गरीब होतो. वडिलांचा चित्रपट फ्लॉप झाला आणि आम्ही आमचे सर्व पैसे गमावले. आमचे नातेवाईक आमची काळजी घ्यायचे. नातेवाईकांनी आम्हाला त्यांच्या घरात राहू दिलं होतं,” असं फराह म्हणाली होती.