फराह खान बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफरपैकी एक आहे. फराहने आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली आहे. ती ९० च्या दशकातील गाण्यांच्या शूटिंगचे अनेक किस्से मुलाखतींमध्ये सांगत असते. आता तिने पूजा बेदीबरोबर शूटिंग करतानाचा एक प्रसंग सांगितला आहे. हा मजेदार किस्सा नेमका काय, ते जाणून घेऊयात.

९० च्या दशकातील ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील ‘पहला नशा’ गाण्यासाठी शूटिंग करताना घडलेला प्रसंग फराह खानने सांगितला. या गाण्याचं शूटिंग करताना पूजाला खूप अडचणी आल्या होत्या. इतकंच नाही तर पूजा बेदी तिचा स्कर्ट पकडायला विसरली आणि स्कर्ट तिच्या डोक्यापर्यंत उडाला, त्यावेळी एक स्पॉट बॉय चक्कर येऊन पडला, असंही ती म्हणाली.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत फराहने या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगितली. “सर्वांना माहित आहे की सरोज जी ते गाणं करत होत्या. मग काहीतरी घडलं आणि त्यांना श्रीदेवी की माधुरीबरोबर शूट करण्यासाठी मुंबईला परत जावं लागलं आणि आम्ही ऊटीला होतो. त्या निघून गेल्या आणि परत आल्या नाहीत. तोपर्यंत मी काही शोची कोरिओग्राफी करत होते. त्यावेळी दिग्दर्शक मन्सूर खानने मला बोलावलं आणि शूटिंग न केल्यामुळे त्यांचे पैसे बुडत आहेत, त्यामुळे ते गाणं मी करावं, असं सुचवलं,” असं फराह खान म्हणाली.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

फराह खानने दिग्दर्शकाकडे एक दिवसाचा वेळ मागितला होता. तिने या गाण्यात स्लो मोशन जोडून ते तयार केलं. इतकंच नाही तर फराहने पूजा बेदीला मर्लिन मुनरोच्या आयकॉनिक लूकमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. या सीनमध्ये पूजाला कारवर उभं राहायचं होतं आणि स्टाफपैकी एक जण पंख्याच्या मदतीने तिचा स्कर्ट खालून उडवणार असं ठरलं.

वडिलांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह, आता अभिनेत्याने पत्नीवर क्रूरतेचे आरोप करत मागितला घटस्फोट, ५ वर्षांत मोडला संसार

हसत हसत हा किस्सा सांगत फराह म्हणाली, “पूजा बेदीला मर्लिन मुनरो स्टाईलमध्ये शूट करण्याची माझी कल्पना होती. मी पूजाला सांगितलं की जेव्हा पंखा सुरू होईल तेव्हा तू तुझा स्कर्ट मर्लिन मुनरोच्या पोजमध्ये पकड. पहिल्या शॉटमध्ये एका स्पॉट बॉयने पंखा धरला होता, पंखा सुरू झाला आणि पूजा स्कर्ट पकडायला विसरली आणि स्कर्ट हवेत वर उडाला. हे सर्व पाहून पंखा घेऊन खाली बसलेला स्पॉट बॉय बेशुद्ध झाला. तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की थाँग (स्विमवेअर किंवा अंतर्वस्त्राचा प्रकार) कसा दिसतो. पण हा सीन शूट करताना पूजा एकदम बिंधास्त होती आणि तिला कशाचीही पर्वा नव्हती.”

Story img Loader