ड्रामा क्वीन राखी सावंत फराह खान दिग्दर्शित व शाहरुख खान व सुश्मिता सेनच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मै हूं ना’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटासाठी राखी बुरखा घालून ऑडिशन द्यायला आली होती. यासंदर्भातील एक आठवण फराह खानने सांगितली आहे. तसेच राखीबरोबर काम करण्याचा अनुभवही फराह खानने सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत ‘मैं हूं ना’ च्या शूटिंगसाठी सहभागी झाली. त्यांनी आधी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केले होते पण तिच्या आईच्या फार मागण्या होत्या, त्यामुळे तिला चित्रपटातून काढलं. “त्या अभिनेत्रीच्या आईने मागणी केली होती की ती एका मोठ्या हॉटेलमध्ये राहील, जिथे शाहरुख खान राहतो. शूटिंग सुरू होण्यापूर्वी तिच्या खूप मागण्या होत्या,” असं फराह म्हणाली.

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

फराह पुढे म्हणाली की तिने आपल्या सहाय्यकाला फोन केला आणि विचारलं की या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीचे ऑडिशन घेण्यात होते. मग तिला कळालं की राखीने ऑडिशन दिली होती. “राखी बुरखा घालून ऑडिशनला आली होती. ‘हॉट गर्ल’ची भूमिका होती. राखीने तिच्या टिपिकल स्टाईलमध्ये त्याला कॅमेरा रोल करायला सांगितला. मग तिने बुरखा काढला आणि आत तिने फक्त बिकिनी घातली होती. कॅमेरामनलाही हे अपेक्षित नव्हतं, त्यामुळे सगळेच चकित झाले होते. पण तिचे केस केशरी असल्याने आम्ही तिला लगेच सिनेमात घेतलं नाही, मग ती दार्जिलिंगला आली की तिला आम्ही नीट कपडे घालायला देत होतो, मी तिला स्वेटर आणि इतर वस्तू देत होते, पण तिला मात्र एक्सपोज करायचं होतं. मग मी तिला म्हणायचे की तू या पूर्ण कपड्यांमध्येही सुंदर दिसतेस,” अशी आठवण फराहने सांगितली.

“एका बापाला आणखी काय हवं?” लेकीच्या ‘या’ कामगिरीवर भारावले शरद पोंक्षे; म्हणाले, “आधी पायलट अन्…”

राखीसह काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, असं फराहने सांगितलं. “तिच्यासह काम करणं खूप चांगलं होतं. तिची एकच विनंती होती की तिला गाण्यात शाहरुखच्या पुढे किंवा त्याच्या मागे उभे करावे. त्यातच ती खूश होती,” असं फराह म्हणमाली. ‘मैं हूं ना’ हा २००४ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan recalls when rakhi sawant came for main hoon na audition in burka wearing bikini underneath hrc