फराह खान(Farah Khan)बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. कोरिओग्राफर असलेल्या फराह खानने काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. काही कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली आहे. सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये ती परीक्षक म्हणून काम करत आहे. याबरोबरच फराह खानचे यूट्यूब चॅनेलसुद्धा आहे. या चॅनेलवर ती अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रण देते. ते जेवण बनवतात तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. आता मात्र फराह खानने तिच्या मुलींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री रूबीना दिलैक नुकतीच फराह खानच्या यूट्यूबवरील एका भागात दिसली. रूबिना दिलैकला दोन जुळ्या मुली आहेत. अभिनव शुक्ला व रूबिनाच्या मुलींची इधा व जीवा अशी नावे आहेत. रूबिना अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसते, तर फराह खान तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. आता रूबिनाने फराह खानला ती मुलांना कशी सांभाळते, मुलांचे पालन पोषण करताना ती काय करते, ती त्यांच्याशी कशी वागते याबाबत तिला सल्ला विचारला. फराहने यावेळी बोलताना म्हटले, “जेव्हा मला तीन मुले होणार आहेत हे समजले, तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला दोन मुले व्हावीत आणि एक मुलगी व्हावी. पण, देवाने माझे काही ऐकले नाही, आणि सुदैवाने मला दोन मुली झाल्या आणि एक मुलगा आहे.”

“माझी तीनही मुले पुढच्या वर्षी कॉलेजला जातील. आता ती १७ वर्षांची आहेत. सुदैवाने ती जास्त मोठी झालेली नाहीत. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला आणि त्यांना तो वाढदिवस आमच्याबरोबर साजरा करायचा होता. त्यांना कोणत्याही क्लब किंबा पार्टीमध्ये जाण्याऐवजी आमच्याबरोबर म्हणजेच कुटुंबाबरोबर जेवण करायचे होते. माझ्या मुली आतापर्यंत कधीच क्लबमध्ये गेल्या नाहीत. त्यांनी कधीही मेकअपचा वापर केला नाही. त्या पार्लरमध्येसुद्धा गेल्या नाहीत. त्यांनी आतापर्यंत फक्त अभ्यासावरच लक्ष क्रेंद्रित केले आहे.”

पुढे फराह खानने म्हटले की, मी कडक शिस्तीची आई आहे. मला माहीत असल्याशिवाय ते कुठेही जाऊ शकत नाहीत. रोज संध्याकाळी आम्ही गप्पा मारतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे समजते. जरी मी कडक शिस्तीची आई असली तरी मी तितकीच विनोदी आणि कूलसुद्धा आहे. त्या सगळ्यांना एकसारखेच वाढवले आहे. फक्त मी माझ्या मुलाबरोबर जरा जास्त कडक वागते. विशेषत: आता मला त्याला सांगावे लागते की मुलींशी कसे बोलले पाहिजे, काय बोलले पाहिजे, काय बोलले नाही पाहिजे, तसेच त्याचे मित्र त्याच्या बहिणीशी एक विशिष्ट पद्धतीने बोलू शकत नाहीत. जरी ते कोणत्याही मुलीबद्दल बोलत असले तरी तो त्याचा भाग नसला पाहिजे.”

दरम्यान, या व्लॉगमध्ये रूबिनाने सांगितले की, जेव्हा तिच्या मुलींचा जन्म झाला तेव्हा अभिनव व तिने जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली. सध्या रूबिना ‘लाफ्टर शेफ्स सीजन २’ मध्ये दिसत आहे.