बॉलीवूडमधील काही कलाकार व दिग्दर्शकांच्या जोड्या लक्ष वेधून घेतात. त्यापैकी एक जोडी शाहरूख खान(Shahrukh Khan) व फराह खान(Farah Khan) यांची आहे. फराह खानने शाहरूखच्या अनेक गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. त्यानंतर जेव्हा फराह खानने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले त्यावेळी शाहरूखने फराह खानच्या चित्रपटात काम केले. इतकेच नव्हे, तर फराह खानचा पहिला चित्रपट ‘मैं हूँ ना’ची निर्मितीही त्याने केली. त्यानंतर दोघांनी हॅपी न्यू इयर आणि ओम शांती ओम या चित्रपटांत एकत्र कामही केले. पण, एक दशकापेक्षा जास्त काळ फराह खानने चित्रपटांचे दिग्दर्शन केले नाही. आता फराह खानने पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन करण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच जेव्हा जेव्हा ती शाहरुखबरोबर काम करायची त्या त्या वेळी अभिनेता तिला भेटवस्तू म्हणून काय द्यायचा, याचादेखील खुलासा तिने केला आहे.

प्रत्येक चित्रपटानंतर शाहरुखने मला…

अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांच्या व्लॉगमध्ये फराह खानने हजेरी लावली होती. या व्लॉगमध्ये आतापर्यंत या कलाकाराकडून कोणत्या महागड्या भेटवस्तू म्हणून मिळाल्या, याबाबत फराह खानने खुलासा केला. फराह खानने म्हटले, “प्रत्येक चित्रपटानंतर शाहरुखने मला कार गिफ्ट म्हणून दिली आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्चना पूरन सिंग यांनी फराह खानने नवीन चित्रपट बनवला पाहिजे, असा सल्ला दिला. त्यावर फराह खानने म्हटले, “हो, मला नवीन चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे. एखादा चित्रपट दिग्दर्शित करून, मला खूप वेळ झाला आहे आणि मला नवीन कारसुद्धा हवी आहे.”

Saif Ali Khan Knife Attack Case Accused Arrested
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव काय, मुंबईत केव्हा आला? पोलिसांनी दिली माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dhananjay Mund
वाल्मिक कराडबरोबर आर्थिक हितसंबंध? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Saif Ali Khan News
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर आधी त्याच्या घरी सफाई कामगार म्हणून गेला होता? नेमकी काय माहिती समोर?
saif ali khan attack car mumbai police arrest accused
सैफ अली खानच्या हल्लेखोराला अखेर अटक; मुंबई पोलिसांनी ठाण्यातून घेतलं ताब्यात, चौकशी सुरू
Saif Ali Khan News
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त, पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
Saif Ali Khan attacker , Kandalvan , thane,
ठाणे : कांदळवनाच्या जंगलात असा सापडला सैफ अली खानचा हल्लेखोर
What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत, “…आता कॉलर उडवण्याचे दिवसही गेले राव”

२०१४ मध्ये जेव्हा हॅपी न्यू इयर प्रदर्शित झाला, त्यावेळी शाहरुखने फराह खानला मर्सिडीज एसयूव्ही कार भेट दिली होती. ओम शांती ओम चित्रपटानंतर अभिनेत्याने मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. तर मैं हूँ ना चित्रपटानंतर किंग खानने फराह खानला ह्युंदाई टेराकन ही गाडी भेट दिली होती.

फराह खान व शाहरुख खान यांच्यात व्यावसायिक नात्याबरोबरच चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच एका मुलाखतीत फराह खानने म्हटले की, जेव्हा ती बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होती, त्यावेळी ती अनेक चढ-उतारांचा सामना करत होती. तिच्या वाईट काळात शाहरुख तिच्याबरोबर होता, असे तिने म्हटले होते. फराह खानने ती आठवण सांगताना म्हटले होते, “एक दिवस मला डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, तुम्ही गर्भवती नाहीये. आम्ही एक कॉमेडी सीन शूट करत होतो आणि शाहरुखला समजले की, काहीतरी चुकीचे घडले आहे. कारण- मी रडणार होते. त्यामुळे त्याने शूटिंगमध्ये ब्रेक घेतला आणि तो मला त्याच्या व्हॅनमध्ये घेऊन गेला. तिथे मी तासभर रडत होते.”

दरम्यान, शाहरुख खान लवकरच किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खान व अभिनेता अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

Story img Loader