चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक असल्याचे वक्तव्य दिग्दर्शिका फराह खानने केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान यांनी मास्टरक्लासमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी या मास्टरक्लासचे संचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे बोलताना फराह खान म्हणाली, “गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम साँगपेक्षा अशी गाणी करणे मला जास्त आवडेल. एक कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून मला ही माझी ताकद वाटते. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते.”

फक्त १४ दिवसांत लिहिला ओम शांती ओम

“कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती. कोरिओग्राफर म्हणून काम करत असले तरी दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे हे पक्के ठरवले होते. त्यामुळे ओम शांती ओम सारखा चित्रपट केवळ १४ दिवसात लिहून पूर्ण झाला. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्वाची आहे,” असे फराह खान म्हणाली.

मुलाखतीत बोलताना फराह खान

स्वतःचं वेगळेपण जपा – फराह खान

पुढे बोलताना फराह खान म्हणाली, “इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण जपत कार्यरत राहणे गरजेचे आहे. तुम्ही जे स्वप्न पाहता ते ही सत्यात उतरवविण्यासाठी प्रचंड मेहनत काम करा. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी संदर्भात स्वतः कारणे देण्यापेक्षा काम करत राहिले पाहिजे. या जगात अशक्य असे काहीच नाही, केवळ आपण विश्वास ठेवत मेहनत करणे आवश्यक आहे.”

अपयशांच्या कारणांचे विश्लेषण करा – फराह खान

‘कभी हा कभी ना’ चित्रपट माझ्यासाठी जसा कोरिओग्राफर म्हणून महत्वाचा ठरला तसाच ‘ओम शांती ओम’ दिग्दर्शक म्हणून महत्वाचा आहे. चार चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील एकाला अपयश आले, मात्र अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागले तरच आपण पुढे जाऊ शकतो असा विश्वास तिने चित्रपटनिर्मिंती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला. फराह खानने अतिशय खुमासदार शैलीत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan says she wrote om shanti om in 14 days hrc