बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा ​​दरवर्षी जंगी आणि भव्य अशी दिवाळी पार्टी आयोजित करण्यासाठी ओळखला जातो. कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या पार्ट्यांना वेगवेगळ्या लुकमध्ये, स्टायलिश कपडे परिधान करून हजेरी लावतात. या वर्षीही मनीष मल्होत्राने दिवाळीनिमित्त एक आलीशान पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सगळ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. नृत्यदिग्दर्शिका व दिग्दर्शिका फराह खानने नुकतंच मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी आणि सेलिब्रिटींच्या कपड्यांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फराहच्या म्हणण्याप्रमाणे मनीष त्याच्या दिवाळी पार्टीसाठी सर्व सेलिब्रिटींना स्वतःचे डिझाइन केलेले कपडे देतो. दुसऱ्या दिवशी सेलेब्स त्यांचे ते कपडे मनीष मल्होत्राला परत करतात. कॉमेडीयन भारती सिंहच्या टॉक शोवर नुकतीच फराहने हजेरी लावली त्यावेळी तिने या गोष्टीचा खुलासा केला. फराह म्हणाली, “मनीषने त्याच्या पार्टीत आम्हा सगळ्यांना त्याने डिझाईन केलेले कपडे दिले, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ते कपडे त्याला परत केले.”

आणखी वाचा : सिक्स पॅकसाठी किंग खानने बंद केलेले पाणी पिणे; फराह खानने सांगितला ‘ओम शांती ओम’दरम्यानचा किस्सा

फराहच्या या वक्तव्यावर भारती अचंबित झाली. पुढे फराह म्हणाली, “मनीषच्या पार्टीत सामील होणाऱ्या प्रत्येकाने मनीषकडे त्यांच्यासाठी कपडे डिझाईन करायची विनंती केलेली असते, एकाअर्थी पाहायला गेलं तर हे मनीषसाठी उत्तमच आहे, कारण यामुळे इतर लोकांनाही मनीषचे कपडे पाहायला मिळतात. तो दिवस म्हणजे जणूकाही सगळ्या बड्या सेलिब्रिटीजचा फॅशन शोच असतो जिथे ते मनीषने डिझाईन केलेले कपडे परिधान करून वावरतात.”

यंदाच्या मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बऱ्याच स्टार्सनी हजेरी लावली. सलमान खान, ऐश्वर्या राय, रेखा, सिद्धार्थ आणि कियारा, जान्हवी कपूर, सोनम कपूर अशा सेलिब्रिटीजनी यंदा हजेरी लावली. यांच्याबरोबरीनेच ज्यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे अशा अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूरनेही या पार्टीत हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan says stars return their clothes to manish malhotra on his diwali party avn