शाहरुख खानचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. शाहरुख खानने चित्रपटात पहिल्यांदा सिक्स पॅक अॅब्स दाखवले. त्याचा हा अवतार पाहून प्रेक्षक आणि किंग खानचे चाहते थक्कच झाले. कित्येक तरुणांनी शाहरुखच्या या सिक्स पॅकची कॉपी करायल सुरुवात केली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की याच सिक्स पॅक अॅब्सच्या नादात शाहरुखला अन्नच नव्हे तर पाण्यापासूनही लांब राहावं लागलं होतं.

हा नेमका किस्सा दिग्दर्शिका फराह खान हिनेच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. ‘ओम शांती ओम’च्या ‘दर्द-ए-डिस्को’ गाण्यात शाहरुखने प्रथमच शर्ट उतरवला होता आणि चित्रपटाबरोबरच या गाण्यानेही धुमाकूळ घातला होता. फराह याबद्दल म्हणाली, “शर्ट नसलेला शाहरुखचा शॉट मला ‘मै हूं ना’ या चित्रपटासाठी हवा होता, परंतु तेव्हा त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने तो फारसा वर्कआऊट किंवा जीम करू शकणार नव्हता. नंतर ओम शांती ओमच्या वेळीस त्याने प्रथमच स्क्रीनवर शर्टलेस होण्यास तयारी दर्शवली.”

Mamta Kulkarni
सलमान-शाहरुख खानने ममता कुलकर्णीच्या तोंडावर दरवाजा केलेला बंद; म्हणाली, “गुडघ्यावर बसून ५,००० लोकांमध्ये…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
Kabir Khan visits Mahakumbh Mela
महाकुंभ मेळ्यात पोहोचला प्रसिद्ध मुस्लीम दिग्दर्शक, म्हणाला, “तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर…”

आणखी वाचा : शाहरुखच्या वाढदिवसाच्या जंगी पार्टीतून इमरान हाश्मीने घेतलेला काढता पाय; अभिनेत्याने सांगितलं नेमकं कारण

पुढे फराह म्हणाली, “यासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत तर घेतली, परंतु शुटींगच्या दोन दिवसआधी शाहरुखने पाणीसुद्धा प्यायलं नव्हतं, कारण पाणी प्यायल्याने तुमचं शरीर थोडं फुलतं. ‘दर्द-ए-डिस्को’मध्ये तो नीट नाचूही शकत नव्हता कारण पाणी न प्यायल्याने त्याच्या संपूर्ण शरीरात गोळे येत होते.” अशा रीतीने ते गाणं शाहरुखने शूट केलं आणि चित्रपट हीट होण्यासाठी त्याचा चांगलाच फायदा झाला.

आजही शाहरुख त्याच उत्साहाने काम करतो हे फराह खानने स्पष्ट केलं. नुकतंच ‘जवान’च्या ‘चलेया’ गाण्यासाठी फराह आणि शाहरुख दोघांनी एकत्र काम केलं. त्या गाण्यासाठीही शाहरुखने सराव केला होता. सराव केला तर त्या गाण्यात आणखी जास्त मजा येईल असं त्याचं म्हणणं असतं हेसुद्धा फराहने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. शाहरुख खानचा आता ‘डंकी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

Story img Loader