बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली.

मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे. फरहान अख्तरच्या‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहचा दिसणार असून नुकताच त्याचा फर्स्ट लूकसुद्धा व्हायरल झाला आहे आणि यामुळे फरहानला लोकांचा चांगलाच रोष बघावा लागत आहे. शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंहची निवड पाहून बरेच लोक नाखुश असल्याचं दिसत आहे.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Bollywood actor Shahrukh khan wear 63000rd Hermes necklace at son abram school annual function
Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”
Girish Mahajan On Chhagan Bhujbal
Girish Mahajan : “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, गिरीश महाजनांचं मोठं विधान
Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव
Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray On Chhgan Bhujbal : “त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं”, भुजबळांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आणखी वाचा : “मी तिच्यासारखं…” लता मंगेशकर यांच्या गायकीशी तुलना होऊ नये यासाठी आशा भोसलेंनी घेतलेली ही काळजी

लोकांच्या याच टिकेवर नुकतंच फरहान अख्तरने भाष्य केलं आहे. अशीच टीका फरहानला शाहरुखला ‘डॉन’म्हणून घेताना सहन करावी लागली असल्याचा त्याने खुलासा केला. ‘एबीसी नेटवर्क’शी संवाद साधताना फरहान म्हणाला, “रणवीर हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि तो यासाठी योग्य आहे. रणवीर स्वतःसुद्धा यासाठी खूप उत्सुक आहे, पण आमच्यासाठी हे नवीन नाही. जेव्हा आम्ही शाहरुखला ‘डॉन’ म्हणून घ्यायचं ठरवलं तेव्हासुद्धा सगळे हेच म्हणाले होते की अमिताभ बच्चन यांची जागा कुणी घेऊ शकणार नाही.”

शाहरुख नसेल तर डॉन ३ पाहणार नाही असा पवित्राही काही नेटकऱ्यांनी घेतला आहे. एकूणच जे प्रेक्षक शाहरुखच्या ‘डॉन ३’ची आतुरतेने वाट पहात होते त्यांचा हा टीझर पाहून हिरमोड झाला आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द फरहान अख्तर याचं दिग्दर्शन करणार आहे.

Story img Loader