Farhan Akhtar Interview: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाविषयी अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. पण असं असलं तरी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट न आवडणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. जावेद अख्तर, कंगना रणौत आणि काही मराठी कलाकारांनी देखील या सुपरहिट चित्रपटावर टीका केली होती. आता या यादीत अभिनेता फरहान अख्तरची देखील भर पडली आहे. फरहान अख्तरने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत

अभिनेता फरहान अख्तरने नुकतीच पत्रकार फेय डिसुझा यांना मुलाखत दिली. यावेळी फरहानने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “मला कधीच कोणाला सांगावसं वाटत नाही की, तुम्ही ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहा. याचं कारण म्हणजे या चित्रपटातील रणबीरची भूमिका मला आक्षेपार्ह वाटते. एक अभिनेता म्हणून मलाच ही भूमिका आवडली नाही. त्यामुळे मी इतरांना सांगूच शकत नाही की, तुम्ही हा चित्रपट पाहा.”

फरहानला पुढे असं विचारलं की, जर तुला या चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा निर्मिती करायची संधी मिळाली असती तर, तू काय बदल केले असते? यावर उत्तर देत फरहान म्हणाला की, मुळातच मला हा चित्रपट फारसा आवडला नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यातील रणबीरची भूमिका. चित्रपटातील त्याची भूमिका समस्याजनक आहे.असं माझं वैयक्तिक मत आहे. ‘डॉन ३’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने फरहान मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा- प्रियांका चोप्राच्या भावाचा पार पडला साखरपुडा! पाया पडून घेतले बहिणीचे आशीर्वाद, फोटो आले समोर

याआधी देखील फरहानने युट्युबर राज शमीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. फरहान अभिनेता असण्याबरोबर दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा कशा असाव्यात याची त्याला चांगलीच जाण आहे. अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीरला एका ‘अल्फा मेल’ पुरुषाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणलं होतं. त्यामुळे पॉडकास्टमध्ये फरहानला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाविषयीचंं त्याचं मत विचारलं होतं.

हेही वाचा- Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

या सगळ्याचा संदर्भ जोडत फरहानने चित्रपटात साकारलेल्या ‘अल्फा मेल’ व्यक्तिरेखांची तुलना करायला सांगितली होती. तेव्हा फरहान म्हणाला की, मी अशा क्षेत्रात आहे जिथे कोणी कोणाला म्हणू शकत नाही की, तुम्ही साकारत असलेली कलाकृती चुकीची आहे. मी कधीच कोणत्या दिग्दर्शक किंवा लेखकाला त्याचं काम शिकवायला जात नाही. कोणता चित्रपट चूक आणि कोणता बरोबर याबाबत आपल्या देशात कायदे भक्कम आहेत. तसंच कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, असं मत त्याने पॉडकास्टवर मांडलं होतं. फरहानचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लवकरच त्याचा नवा चित्रपट ‘डॉन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

Story img Loader