ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी अमिताभ आणि जया बच्चन या दोघांबरोबरही काम केलं आहे. नुकताच त्यांनी या दोघांसह काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्या दोघांशी असलेल्या नात्याबद्दलही त्यांननी भाष्य केलं. मी अनेकदा दोघांबरोबर लाँग ड्राईव्ह व कॉफी प्यायला जायचे, असं फरीदा म्हणाल्या.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या एका मुलाखतीत फरीदा म्हणाल्या, “माझे अमितजींबरोबर खूप जुने नाते आहे आणि त्याहीपेक्षा जुने जया यांच्याशी आहे. आजही आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. जरी वारंवार भेटत नसलो तरीही, त्याचा आमच्या एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमावर परिणाम झाला नाही.” अमिताभ आणि जया यांच्याबरोबर वेळ घालवण्याबद्दल फरीदा म्हणाल्या, “तेव्हा आमचा एक मोठा ग्रुप होता आणि आम्ही नेहमी भेटायचो. मला आठवतंय जेव्हा अमिताभ आणि जया लग्नाच्या आधी एकमेकांना डेट करत होते. तेव्हा ते मला रात्री पाली हिल्समधील माझ्या घरून घेऊन जायचे आणि आम्ही ताज येथे कॉफी घेण्यासाठी ड्राईव्ह करून जायचो.”

प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

फरीदा यांनी सांगितलं की आजकाल त्यांच्या फारशा भेटीगाठी होत नसल्या तरी त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर अजूनही तसाच आहे. “आताही अमितजी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतात. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या वेळी मी त्यांना भेटले होते. १९७५ मध्ये आलेला मजबूर हा चित्रपट विशेष भूमिका होता कारण त्या चित्रपटात मिस्टर बच्चन माझ्याबरोबर होते. भूमिका वेगळी असल्यानेही तो चित्रपट खास होता,” असं फरीदा म्हणाल्या.

दरम्यान, फरीदा, अमिताभ आणि जया यांनी २००१ मध्ये आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काजोल, शाहरुख खान, राणी मुखर्जी, हृतिक रोशन आणि करीना कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.