अमिताभ बच्चन व जया भादुरी लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी ते अनेकदा ताज हॉटेलमध्ये कॉफी प्यायला आणि लाँग ड्राइव्हवर जायचे. यावेळी त्यांच्यात खूप भांडणं व्हायची आणि त्या भांडणाच्या साक्षीदार इंडस्ट्रीतील एक ज्येष्ठ अभिनेत्री राहिल्या आहेत. कारण अमिताभ व जया दोघेही या अभिनेत्रीला त्यांच्यासोबत न्यायचे. त्या अभिनेत्री म्हणजे फरीदा जलाल होय.
आजवर आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या फरीदा जलाल या नुकत्याच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये दिसल्या होत्या. फरिदा यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. या तिघांची खूप घट्ट मैत्री आहे. फरीदा यांनी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचे काही किस्से सांगितले आहेत.
अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…
“मी पाली हिलमध्ये राहायचे आणि अमितजी जुहूमध्ये राहायचे. त्यांचे लग्न होणार होते, झाले नव्हते. दोघांची कोर्टशिप सुरू होती आणि ते जोडप्यासारखे भांडत असायचे. रात्री अमितजी स्वतः गाडी चालवायचे आणि जया शेजारी बसायची आणि मी पाठीमागे बसायचे. मी त्यांना म्हणायचे, मला ‘कबाब में हड्डी’ बनायला का आणता तुम्ही दोघे?” असं फरीदा जलाल यांनी बॉलीवूड बबलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…
फरीदांनी आठवण सांगितली की रात्री उशीर व्हायचा त्यामुळे मला कॉफी आउटिंगला सोबत नेऊ नका, असं खूपदा त्यांना सांगायचे. “मी लवकर झोपायचे, पण तरीही ते मला कॉल करायचे. ते खूपदा भांडायचे आणि मी त्याची साक्षीदार आहे. जया रडायची आणि अमिताभ तिची समजूत काढायचे. मला ते क्षण खूप आवडायचे. माझी जयाशी खूप चांगली मैत्री आहे. मी तिला प्रेमाने जिया म्हणायचे. कॉफी डेटवरून परतताना ते चित्रपटांबद्दल बोलायचे. त्यानंतर ते मला सोडून मग घरी जायचे. ते खूप चांगले आहेत. त्यांनी मला आणि गुलजार साहब दोघांना त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं, आमच्याशिवाय इंडस्ट्रीतील इतर कोणीही त्यांच्या लग्नात नव्हतं,” असं फरीदा जलाल म्हणाल्या.
अमिताभ व जया एकमेकांशी खूप भांडायचे, पण ती भांडणं गंभीर नसायची, असं फरीदा जलाल यांनी सांगितलं. “त्यांची भांडणं फार फालतू गोष्टींवरून व्हायची, जे मी सांगू शकत नाही. ते लहान मुलांसारखे भांडायचे. पण त्या भांडणात राग किंवा वाईटपणा नसायचा, ते एकमेकांशी प्रेमाने भांडायचे. जया खूप लवकर रुसायची,” असं फरीदा जलाल म्हणाल्या.